S M L

एका सामुदायिक विवाह सोहळ्याची गोष्ट !

29 जानेवारीएकाच मांडवात सर्व जाती धर्मातील 1017 जोड्यांचा सामुहिक विवाह सोहळा होतं आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं याआधी अनेक दिग्गज राजकारण्यांचे राजेशाही विवाह सोहळे बघितले आहे. याच परंपरेत मोडणार असाच एक विवाहसोहळा ठाणे जिल्ह्यातील विरार येथे चंदन सार या 400 एकर खुल्या मैदानात होतं आहे. या शाही लग्नात 1017 जोडपे विवाहबध्द झाले. या सामूहिक विवाह सोहळ्याचे खास आकर्षण आहे क्षितीज ठाकूर हा नवरदेव. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेन्द्र ठाकूर यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात त्यांचाच मुलगा क्षितीज हा ही विवाहबद्ध झाला आहे. विशेष म्हणजे क्षितीज ठाकूर आणि प्राची गाळवणकर या खास जोडीचा हा प्रेमविवाह आहे. या संपूर्ण सामूहिक विवाह सोहळ्याचा खर्च जवळपास 10 कोटींच्या आसपास असल्याची चर्चा आहे. हा खर्च विष्णू वामन चॅरिटेबल करणार आहे. सर्व वधूवरांना कपडे,भांडी यासह मंगळसूत्रही ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच बाळंतपणासाठी दोन हजार रुपये पण देण्यात आले आहेत. या सामूहिक विवाहसोहळ्याचं वैशिष्ठ्य म्हणजे यातील 1017 विवाहबध्द होणा-या जोडप्यात यात सर्व जाती धर्मातील जोड्यांचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2012 03:34 PM IST

एका सामुदायिक विवाह सोहळ्याची गोष्ट !

29 जानेवारी

एकाच मांडवात सर्व जाती धर्मातील 1017 जोड्यांचा सामुहिक विवाह सोहळा होतं आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं याआधी अनेक दिग्गज राजकारण्यांचे राजेशाही विवाह सोहळे बघितले आहे. याच परंपरेत मोडणार असाच एक विवाहसोहळा ठाणे जिल्ह्यातील विरार येथे चंदन सार या 400 एकर खुल्या मैदानात होतं आहे. या शाही लग्नात 1017 जोडपे विवाहबध्द झाले. या सामूहिक विवाह सोहळ्याचे खास आकर्षण आहे क्षितीज ठाकूर हा नवरदेव. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेन्द्र ठाकूर यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात त्यांचाच मुलगा क्षितीज हा ही विवाहबद्ध झाला आहे. विशेष म्हणजे क्षितीज ठाकूर आणि प्राची गाळवणकर या खास जोडीचा हा प्रेमविवाह आहे. या संपूर्ण सामूहिक विवाह सोहळ्याचा खर्च जवळपास 10 कोटींच्या आसपास असल्याची चर्चा आहे. हा खर्च विष्णू वामन चॅरिटेबल करणार आहे. सर्व वधूवरांना कपडे,भांडी यासह मंगळसूत्रही ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच बाळंतपणासाठी दोन हजार रुपये पण देण्यात आले आहेत. या सामूहिक विवाहसोहळ्याचं वैशिष्ठ्य म्हणजे यातील 1017 विवाहबध्द होणा-या जोडप्यात यात सर्व जाती धर्मातील जोड्यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2012 03:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close