S M L

मॉडेल लैला 11 महिन्यांपासून गायब

29 जानेवारीबॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल लैला खान जवळपास 11 महिन्यांपासून गायब आहे आणि तिचा तपास सध्या सुरू आहे. या तपासादरम्यान पोलिसांना तिच्या फार्म हाऊसमधून सॅटलाईट फोनची सामग्री आणि काही सीडीज मिळाल्या आहे. यामध्ये काश्मीरमध्ये झालेल्या एका रॅलीचे व्हिडिओज आहेत.राजेश खन्नांच्या सोबतच्या चित्रपटामधून बॉलिवुडमध्ये प्रवेश केलेली अभिनेत्री लैला खान आणि तिचं कुटुंब गेल्या 11 महिन्यांपासून बेपत्ता आहेत. मुंबई पोलीस सध्या याचा तपास करत आहे. सोबतच महाराष्ट्र एटीएस आणि गुप्तहेर संघटनादेखील आता या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. कारण या कुटुंबासोबतच 2 काश्मिर युवकही गायब आहेत. आणि त्यांचाकडून सॅटलाईट फोनचा वापर व्हायचा हे उघड झालं आहे. इगतपुरीमधल्या फार्महाऊसमध्ये लैलाला शेवटचं पाहण्यात आलं होतं. त्यावेळी तिच्यासोबत परवेझ नावाचा काश्मिरी तरूण होता. याच फार्महाऊसमधून मुंबई पोलिसांना काही पुरावे सापडले आहेत. मुंबई पोलिसांना इथे काही फोटोग्राफ्स, महत्त्वाची कागदपत्रं आणि काही सीडीज मिळाल्या आहेत. यासोबतच इतरही काही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. परवेझ सॅटलाईट फोनचा वापर करायचा त्याचं खरं नाव अतीक होतं आणि तो नाव बदलून लैला सोबत रहायचा हेही आता उघड झालंय. इगतपुरीतीलं फार्महाऊस आणि लैलाच्या ओशिवर्‍यातल्या फ्लॅटमध्ये परवेझ सॅटलाईट फोनचा वापर करायचा. या फार्महाऊसमधून पोलिसांना एक डायरी मिळालेली आहे. यामध्ये अनेक गोष्टी सांकेतिक भाषेत लिहिण्यात आल्या आहेत. याशिवाय यात अनेक मोबाईल नंबर आणि सॅटलाईट डिटेल्स आहेत. याचा वापर पाक व्याप्त काश्मीरमध्येही केला जायचा. शिवाय फार्महाऊसमध्ये मिळालेल्या सीडीजमध्ये अनेक व्हिडिओज मिळालेले आहेत.यासगळ्यावरून परवेझ मुंबईमध्ये लपून राहत होता आणि लैला आणि तिच्या कुटुंबाचा त्यांने वापर केला हे उघड झालंय. मुंबई पोलिसांनी आता या तपासात इतर यंत्रणांची मदत घेतलीय. फार्महाऊसवर लैला आणि परवेझ सोबत आणखीन 3 तरूण होते आणि त्यानंतर एका लग्नाचे निमित्त करून परवेझ लैला आणि तिच्या 5 जणांच्या कुटुंबाला जम्मूला घेऊन गेला होता. त्यांच्या गाडी जम्मूतल्या एका निर्जन स्थळी सापडलेली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2012 10:45 AM IST

मॉडेल लैला 11 महिन्यांपासून गायब

29 जानेवारी

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल लैला खान जवळपास 11 महिन्यांपासून गायब आहे आणि तिचा तपास सध्या सुरू आहे. या तपासादरम्यान पोलिसांना तिच्या फार्म हाऊसमधून सॅटलाईट फोनची सामग्री आणि काही सीडीज मिळाल्या आहे. यामध्ये काश्मीरमध्ये झालेल्या एका रॅलीचे व्हिडिओज आहेत.

राजेश खन्नांच्या सोबतच्या चित्रपटामधून बॉलिवुडमध्ये प्रवेश केलेली अभिनेत्री लैला खान आणि तिचं कुटुंब गेल्या 11 महिन्यांपासून बेपत्ता आहेत. मुंबई पोलीस सध्या याचा तपास करत आहे. सोबतच महाराष्ट्र एटीएस आणि गुप्तहेर संघटनादेखील आता या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. कारण या कुटुंबासोबतच 2 काश्मिर युवकही गायब आहेत. आणि त्यांचाकडून सॅटलाईट फोनचा वापर व्हायचा हे उघड झालं आहे.

इगतपुरीमधल्या फार्महाऊसमध्ये लैलाला शेवटचं पाहण्यात आलं होतं. त्यावेळी तिच्यासोबत परवेझ नावाचा काश्मिरी तरूण होता. याच फार्महाऊसमधून मुंबई पोलिसांना काही पुरावे सापडले आहेत. मुंबई पोलिसांना इथे काही फोटोग्राफ्स, महत्त्वाची कागदपत्रं आणि काही सीडीज मिळाल्या आहेत. यासोबतच इतरही काही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. परवेझ सॅटलाईट फोनचा वापर करायचा त्याचं खरं नाव अतीक होतं आणि तो नाव बदलून लैला सोबत रहायचा हेही आता उघड झालंय.

इगतपुरीतीलं फार्महाऊस आणि लैलाच्या ओशिवर्‍यातल्या फ्लॅटमध्ये परवेझ सॅटलाईट फोनचा वापर करायचा. या फार्महाऊसमधून पोलिसांना एक डायरी मिळालेली आहे. यामध्ये अनेक गोष्टी सांकेतिक भाषेत लिहिण्यात आल्या आहेत. याशिवाय यात अनेक मोबाईल नंबर आणि सॅटलाईट डिटेल्स आहेत. याचा वापर पाक व्याप्त काश्मीरमध्येही केला जायचा. शिवाय फार्महाऊसमध्ये मिळालेल्या सीडीजमध्ये अनेक व्हिडिओज मिळालेले आहेत.

यासगळ्यावरून परवेझ मुंबईमध्ये लपून राहत होता आणि लैला आणि तिच्या कुटुंबाचा त्यांने वापर केला हे उघड झालंय. मुंबई पोलिसांनी आता या तपासात इतर यंत्रणांची मदत घेतलीय. फार्महाऊसवर लैला आणि परवेझ सोबत आणखीन 3 तरूण होते आणि त्यानंतर एका लग्नाचे निमित्त करून परवेझ लैला आणि तिच्या 5 जणांच्या कुटुंबाला जम्मूला घेऊन गेला होता. त्यांच्या गाडी जम्मूतल्या एका निर्जन स्थळी सापडलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2012 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close