S M L

विठ्ठलमूर्तीवर लेप देण्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

29 जानेवारीपंढरपूर विठ्ठलमूर्तीवर लेप देण्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. यात विविध खात्यांचे 7 अधिकारी असून उद्या ही समिती पंढरपूरला भेट देणार आहे. विठ्ठल मूर्तीची झीज रोखण्यासाठी मंदिर समितीनं मूर्तीवर इपॉक्सी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तज्ञांनी या प्रक्रीयेबाबत शंका उपस्थित केली होती. लेप देण्याबाबत घाई घाईनं निर्णय घेण्यात येवू नये अशी मागणी करत वारकर्‍यांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर हा निर्णय मंदिर समितीनं स्थगित केला होता. या सर्व प्रकरणांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही समिती स्थापन केली आहे. या प्रकरणी आयबीएन-लोकमतनं सातत्यानं हा विषय लावून धरला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2012 09:50 AM IST

विठ्ठलमूर्तीवर लेप देण्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

29 जानेवारी

पंढरपूर विठ्ठलमूर्तीवर लेप देण्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. यात विविध खात्यांचे 7 अधिकारी असून उद्या ही समिती पंढरपूरला भेट देणार आहे. विठ्ठल मूर्तीची झीज रोखण्यासाठी मंदिर समितीनं मूर्तीवर इपॉक्सी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तज्ञांनी या प्रक्रीयेबाबत शंका उपस्थित केली होती. लेप देण्याबाबत घाई घाईनं निर्णय घेण्यात येवू नये अशी मागणी करत वारकर्‍यांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर हा निर्णय मंदिर समितीनं स्थगित केला होता. या सर्व प्रकरणांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही समिती स्थापन केली आहे. या प्रकरणी आयबीएन-लोकमतनं सातत्यानं हा विषय लावून धरला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2012 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close