S M L

मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

29 जानेवारीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत मुंबईतील 208 , ठाण्यातील 130 पैकी 115 , पुण्यातल्या 152 पैकी 138 तर नाशिकमधल्या 122 पैकी 115 उमेदवारांची घोषणा राज यांनी केली. यावेळीही ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली तसेच काही प्रभागांचा तांत्रिक मुद्दा सुटल्यावर उरलेल्या सगळ्या उमेदवारांचीही यादी जाहीर होणार आहे असं सांगितले. महापालिकेच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेऊन राज यांनी एक नवा पायंडा पाडला. त्याचबरोबर राज यांनी स्वत: उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्यात. दोन दिवसांपुर्वीच राज यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन उमेदवारांची यादी परवा जाहीर करणार आहोत असं जाहीर केलं. तसेच यावेळी राज यांनी उमेदवारांना तिकीट मिळाले नाही तर जाहीर माफीही मागितली. आज ठरल्याप्रमाणे राज यांनी यादी जाहीर केली. यादीसोबतच उमेदवारांचे मार्कही सोबत जोडले आहेत. यादीत मुंबईतील 208 , ठाण्यातील 130 पैकी 115 , पुण्यातल्या 152 पैकी 138 तर नाशिकमधल्या 122 पैकी 115 उमेदवारांची घोषणा राज यांनी केली. यावेळी राज यांनी काल महाराष्ट्र टाइम्सवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. यांनी याच्या वृतपत्रात काहीही लिहायचे, कोणाबद्दल काहीही बोलायचे आणि दुसर्‍यांनी काही लिहीले तर त्यांच्यावर हल्ला करायचा ही शिवशाही नसून मोघलाई आहे अशा शब्दात राज यांनी शिवसेनेला फटकारले. उमेदवारांच्या यादीचं काय वैशिष्ट्य आहे ?मुंबई : 208 उमेदवार जाहीर फक्त 2 विद्यमान नगरसेवकांना तिकीटएकूण 8 मुस्लीम उमेदवारांना तिकीटएकूण 4 विभाग अध्यक्षांना तिकीटवॉर्ड क्र. 34 (वरळी डेअरी)वत्सला जाधव : शिवसेना विद्यमान नगरसेविकावॉर्ड क्र. 5 (अशोकवन)प्रकाश दरेकर : प्रवीण दरेकर यांचे भाऊवॉर्ड क्र.184 (दादर रेल्वे स्टेशन)सुधीर जाधव : शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका स्नेहल जाधव यांचे पतीवॉर्ड क्र. 202 (घोडपदेव)समिता नाईक : विभाग अध्यक्ष संजय नाईक यांच्या पत्नीवॉर्ड क्र. 194(परळ-बीडीडी)सिद्धी म्हशीलकर : बंटी म्हशीलकर यांच्या पत्नीवॉर्ड क्र. 128 (कामराज नगर)मंगल कदम : विद्यमान नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या पत्नी वॉर्ड क्र. 118 (विक्रोळी पार्कसाईट)गणेश चुक्कल : आमदार मंगेश सांगळे यांचे पी. ए.वॉर्ड क्र. 209 (कामाठीपुरा)आशा मामेडी : मनसेच्या महिला शाखेच्या राज्य उपाध्यक्ष वॉर्ड क्र. 92 (खिरा नगर)गीता चव्हाण : शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळा चव्हाण यांच्या पत्नी

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2012 11:21 AM IST

मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

29 जानेवारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत मुंबईतील 208 , ठाण्यातील 130 पैकी 115 , पुण्यातल्या 152 पैकी 138 तर नाशिकमधल्या 122 पैकी 115 उमेदवारांची घोषणा राज यांनी केली. यावेळीही ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली तसेच काही प्रभागांचा तांत्रिक मुद्दा सुटल्यावर उरलेल्या सगळ्या उमेदवारांचीही यादी जाहीर होणार आहे असं सांगितले.

महापालिकेच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेऊन राज यांनी एक नवा पायंडा पाडला. त्याचबरोबर राज यांनी स्वत: उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्यात. दोन दिवसांपुर्वीच राज यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन उमेदवारांची यादी परवा जाहीर करणार आहोत असं जाहीर केलं. तसेच यावेळी राज यांनी उमेदवारांना तिकीट मिळाले नाही तर जाहीर माफीही मागितली. आज ठरल्याप्रमाणे राज यांनी यादी जाहीर केली. यादीसोबतच उमेदवारांचे मार्कही सोबत जोडले आहेत. यादीत मुंबईतील 208 , ठाण्यातील 130 पैकी 115 , पुण्यातल्या 152 पैकी 138 तर नाशिकमधल्या 122 पैकी 115 उमेदवारांची घोषणा राज यांनी केली. यावेळी राज यांनी काल महाराष्ट्र टाइम्सवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. यांनी याच्या वृतपत्रात काहीही लिहायचे, कोणाबद्दल काहीही बोलायचे आणि दुसर्‍यांनी काही लिहीले तर त्यांच्यावर हल्ला करायचा ही शिवशाही नसून मोघलाई आहे अशा शब्दात राज यांनी शिवसेनेला फटकारले.

उमेदवारांच्या यादीचं काय वैशिष्ट्य आहे ?मुंबई : 208 उमेदवार जाहीर फक्त 2 विद्यमान नगरसेवकांना तिकीटएकूण 8 मुस्लीम उमेदवारांना तिकीटएकूण 4 विभाग अध्यक्षांना तिकीट

वॉर्ड क्र. 34 (वरळी डेअरी)वत्सला जाधव : शिवसेना विद्यमान नगरसेविका

वॉर्ड क्र. 5 (अशोकवन)प्रकाश दरेकर : प्रवीण दरेकर यांचे भाऊ

वॉर्ड क्र.184 (दादर रेल्वे स्टेशन)सुधीर जाधव : शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका स्नेहल जाधव यांचे पती

वॉर्ड क्र. 202 (घोडपदेव)समिता नाईक : विभाग अध्यक्ष संजय नाईक यांच्या पत्नी

वॉर्ड क्र. 194(परळ-बीडीडी)सिद्धी म्हशीलकर : बंटी म्हशीलकर यांच्या पत्नी

वॉर्ड क्र. 128 (कामराज नगर)मंगल कदम : विद्यमान नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या पत्नी

वॉर्ड क्र. 118 (विक्रोळी पार्कसाईट)गणेश चुक्कल : आमदार मंगेश सांगळे यांचे पी. ए.

वॉर्ड क्र. 209 (कामाठीपुरा)आशा मामेडी : मनसेच्या महिला शाखेच्या राज्य उपाध्यक्ष

वॉर्ड क्र. 92 (खिरा नगर)गीता चव्हाण : शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळा चव्हाण यांच्या पत्नी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2012 11:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close