S M L

दुसर्‍या ई साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

29 जानेवारीयुनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या वतीने दुसरं मराठी ई साहित्य संमेलन www.uniquefeatures.in या वेबसाईटवर भरवण्यात आलं आहे.या संमेलनाचं अध्यक्षस्थान कवी ग्रेस यांनी भूषवलं असून एमकेसीएल (MKCL) चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते पुण्यात पत्रकार संघात या संमेलनाचं उदघाटन करण्यात आलं. तंत्रज्ञान चुकीच्या पध्दतीनं वापरलं गेलं तर ते घातक ठरू शकतं म्हणून समाजाला दैवी शहानपणाची गरज आहे आणि हे शहाणपण कलेतून मिळू शकतं असं मत कवी ग्रेस यांनी व्यक्त केलं. ग्रेस यांनी यावेळी मुक्त चिंतन करताना काही कवितांचे वाचनही केलं. विवेक सावंत यांनी लवकरचं तुम्ही एखाद्याशी कुठल्याही भाषेत संवाद साधला तर तो ऐकणार्‍याला त्याला समजणार्‍या भाषेत भाषांतर होऊन तो ऐकता येईल अशा तंत्रज्ञानाचे मोबाईल्स फोन विकसित होतायतं हे सांगताना नव्या तंत्रज्ञानाचा आणि सामाजिक जाणीवांचा धांडोळा घेतला. गेल्या वर्षीच्या पहिल्या ई मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक रत्नाकर मतकरी होते. या संमेलनात लिखित स्वरूपातील मजकुरासोबत ऑडिओ- व्हिडिओ स्वरूपात मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. एकूणच ई मराठी साहित्य संमेलनाची लोकप्रियता दरवर्षी वाढतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2012 12:31 PM IST

दुसर्‍या ई साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

29 जानेवारी

युनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या वतीने दुसरं मराठी ई साहित्य संमेलन www.uniquefeatures.in या वेबसाईटवर भरवण्यात आलं आहे.या संमेलनाचं अध्यक्षस्थान कवी ग्रेस यांनी भूषवलं असून एमकेसीएल (MKCL) चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते पुण्यात पत्रकार संघात या संमेलनाचं उदघाटन करण्यात आलं. तंत्रज्ञान चुकीच्या पध्दतीनं वापरलं गेलं तर ते घातक ठरू शकतं म्हणून समाजाला दैवी शहानपणाची गरज आहे आणि हे शहाणपण कलेतून मिळू शकतं असं मत कवी ग्रेस यांनी व्यक्त केलं.

ग्रेस यांनी यावेळी मुक्त चिंतन करताना काही कवितांचे वाचनही केलं. विवेक सावंत यांनी लवकरचं तुम्ही एखाद्याशी कुठल्याही भाषेत संवाद साधला तर तो ऐकणार्‍याला त्याला समजणार्‍या भाषेत भाषांतर होऊन तो ऐकता येईल अशा तंत्रज्ञानाचे मोबाईल्स फोन विकसित होतायतं हे सांगताना नव्या तंत्रज्ञानाचा आणि सामाजिक जाणीवांचा धांडोळा घेतला. गेल्या वर्षीच्या पहिल्या ई मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक रत्नाकर मतकरी होते. या संमेलनात लिखित स्वरूपातील मजकुरासोबत ऑडिओ- व्हिडिओ स्वरूपात मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. एकूणच ई मराठी साहित्य संमेलनाची लोकप्रियता दरवर्षी वाढतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2012 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close