S M L

उच्चस्तरीय समिती आज विठ्ठलमूर्तीची पाहणी करणार

30 जानेवारीपंढरपूरच्या श्रीविठ्ठलमूर्ती लेप प्रकरणी सरकार नियुक्त 7 सदस्यीय समिती सोलापुरात दाखल झाली आहे. विठ्ठलमूर्तीवर इपॉक्सी कोटिंग करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतला होता. या निर्णयाला वारकरी संघटनांनी जोरदार विरोधात केला. मंदिर समितीनंही वारकरी संघटनांच्या विरोधाची दखल घेत लेप करण्यास स्थगिती दिली. आयबीएन लोकमतने या संवेदनशील प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला होता.अखेर या वादाची दखल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली. विठ्ठल मूर्तीला लेप करण्याची आवश्यकता आहे का ? मूर्तीची झीज किती प्रमाणात झाली आहे ? या प्रश्नांची तपासणी ही समिती करणार आहे. मंदिर समिती, वारकरी संघटना यांच्याशीही या नियुक्त समितीचे सदस्य चर्चा करणार आहे. यानंतर समिती आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे. या पूर्ण प्रकरणात केंद्रीय पुरातत्व विभागाची भुमिका हि अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2012 09:54 AM IST

उच्चस्तरीय समिती आज विठ्ठलमूर्तीची पाहणी करणार

30 जानेवारी

पंढरपूरच्या श्रीविठ्ठलमूर्ती लेप प्रकरणी सरकार नियुक्त 7 सदस्यीय समिती सोलापुरात दाखल झाली आहे. विठ्ठलमूर्तीवर इपॉक्सी कोटिंग करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतला होता. या निर्णयाला वारकरी संघटनांनी जोरदार विरोधात केला. मंदिर समितीनंही वारकरी संघटनांच्या विरोधाची दखल घेत लेप करण्यास स्थगिती दिली. आयबीएन लोकमतने या संवेदनशील प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला होता.

अखेर या वादाची दखल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली. विठ्ठल मूर्तीला लेप करण्याची आवश्यकता आहे का ? मूर्तीची झीज किती प्रमाणात झाली आहे ? या प्रश्नांची तपासणी ही समिती करणार आहे. मंदिर समिती, वारकरी संघटना यांच्याशीही या नियुक्त समितीचे सदस्य चर्चा करणार आहे. यानंतर समिती आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे. या पूर्ण प्रकरणात केंद्रीय पुरातत्व विभागाची भुमिका हि अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2012 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close