S M L

अदनान पत्रावाला हत्याप्रकरणी चारही आरोपींची निर्दोष सुटका

30 जानेवारी2007 मधल्या अदनान पत्रावाला हत्या प्रकरणातल्या चारही आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. 16 वर्षांच्या अदनानची 19 ऑगस्ट 2007 मध्ये हत्या झाल्या होती. त्याच्या मित्रांनीच त्याचा खून केल्याचा आरोप होता. आरोपींनी पहिल्यांदा अदनानशी मैत्री केली. त्यानंतर त्यांनी अदनानचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडून 2 कोटींची मागणी केली. 18 ऑगस्ट 2007 रोजी अदनान आपल्या वडिलांच्या स्कोडा कारमधून मित्रांना भेटायला गेला होता. पण तो परतला नाही. 19 ऑगस्ट रोजी अदनानच्या कुटुंबीयांना खंडणीसाठी फोन आला. 20 ऑगस्ट रोजी नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवर पोलिसांना अदनानचं पार्थिव सापडलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी अदनानच्या 5 मित्रांना अटक केली होती. त्यांच्यावर अपहरण, खंडणी, खून करणे आणि पुरावे नष्ट करणे यासारखे आरोप ठेवण्यात आले होते. पण हे गुन्हे कोर्टात सिद्ध करायला सरकारी पक्षाच्या वकिलाला अपयश आल्याने 4 आरोपींची निर्दोष सुटका झाली. पाचवा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचा खटला ज्युवेनाइल कोर्टात सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2012 11:01 AM IST

अदनान पत्रावाला हत्याप्रकरणी चारही आरोपींची निर्दोष सुटका

30 जानेवारी

2007 मधल्या अदनान पत्रावाला हत्या प्रकरणातल्या चारही आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. 16 वर्षांच्या अदनानची 19 ऑगस्ट 2007 मध्ये हत्या झाल्या होती. त्याच्या मित्रांनीच त्याचा खून केल्याचा आरोप होता. आरोपींनी पहिल्यांदा अदनानशी मैत्री केली. त्यानंतर त्यांनी अदनानचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडून 2 कोटींची मागणी केली. 18 ऑगस्ट 2007 रोजी अदनान आपल्या वडिलांच्या स्कोडा कारमधून मित्रांना भेटायला गेला होता. पण तो परतला नाही. 19 ऑगस्ट रोजी अदनानच्या कुटुंबीयांना खंडणीसाठी फोन आला. 20 ऑगस्ट रोजी नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवर पोलिसांना अदनानचं पार्थिव सापडलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी अदनानच्या 5 मित्रांना अटक केली होती. त्यांच्यावर अपहरण, खंडणी, खून करणे आणि पुरावे नष्ट करणे यासारखे आरोप ठेवण्यात आले होते. पण हे गुन्हे कोर्टात सिद्ध करायला सरकारी पक्षाच्या वकिलाला अपयश आल्याने 4 आरोपींची निर्दोष सुटका झाली. पाचवा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचा खटला ज्युवेनाइल कोर्टात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2012 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close