S M L

'नासा'ची नोकरी सोडून 'तो' उतरला निवडणुकीच्या आखाड्यात

30 जानेवारीशाहरुखच्या स्वदेस चित्रपटासारखी कथा घडतेय बुलडाण्यातल्या लोणारमध्ये...अमेरिकेत स्थायिक झालेल्या मूळच्या बुलडाण्याच्या बाळासाहेब दाभाडे या तरूणाने अमेरिका सोडून आपल्या गावच्या राजकारणात उडी घेतली आहे. लोणार तालुक्याच्या ग्रामीण भागातला बाळासाहेब हा पहिला उच्चशिक्षीत मुलगा आहे. इंजिनिअरीगनंतर बाळासाहेबला नासातल्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली होती. यानंतर त्याने अमेरिकतच स्वत:चा व्यवसाय सुरु केला. त्याचं उत्पन्नही लाखात गेलं. पण गावाकडे आल्यानंतर शेतकर्‍यांच्या समस्यांनी बाळासाहेब विचलित झाला. अखेर अमेरिका सोडून त्याने थेट आपलं गाव गाठलं. कोणत्याही राजकीय पक्षाचं लेबल नसलेल्या बाळासाहेबने जिल्हा परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ग्रामीण भागातील राजकीय डावपेचांपासून अलिप्त असलेल्या बाळासाहेबाचा ध्यास आहे तो आपल्या गावच्या लोकांसाठी काहीतरी करायचा...

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2012 11:16 AM IST

'नासा'ची नोकरी सोडून 'तो' उतरला निवडणुकीच्या आखाड्यात

30 जानेवारी

शाहरुखच्या स्वदेस चित्रपटासारखी कथा घडतेय बुलडाण्यातल्या लोणारमध्ये...अमेरिकेत स्थायिक झालेल्या मूळच्या बुलडाण्याच्या बाळासाहेब दाभाडे या तरूणाने अमेरिका सोडून आपल्या गावच्या राजकारणात उडी घेतली आहे. लोणार तालुक्याच्या ग्रामीण भागातला बाळासाहेब हा पहिला उच्चशिक्षीत मुलगा आहे. इंजिनिअरीगनंतर बाळासाहेबला नासातल्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली होती. यानंतर त्याने अमेरिकतच स्वत:चा व्यवसाय सुरु केला. त्याचं उत्पन्नही लाखात गेलं. पण गावाकडे आल्यानंतर शेतकर्‍यांच्या समस्यांनी बाळासाहेब विचलित झाला. अखेर अमेरिका सोडून त्याने थेट आपलं गाव गाठलं. कोणत्याही राजकीय पक्षाचं लेबल नसलेल्या बाळासाहेबने जिल्हा परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ग्रामीण भागातील राजकीय डावपेचांपासून अलिप्त असलेल्या बाळासाहेबाचा ध्यास आहे तो आपल्या गावच्या लोकांसाठी काहीतरी करायचा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2012 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close