S M L

पंजाब 80 टक्के तर उत्तराखंडमध्ये 70 टक्के मतदान

30 जानेवारीपंजाब आणि उत्तराखंडमध्ये आज विधानसभेसाठीचं मतदान झालं. पंजाबमध्ये जवळपास 80 टक्के मतदान झालं. काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झालं.लुधियानामध्ये भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसावर हल्ला करण्यात आला. तर भटिंडामध्ये डेरा सच्चा सौदाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. विधानसभेच्या 117 जागांसाठी 1,078 उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्येही आज मतदान झालं. तिथं 70 टक्के मतदानाची नोंद झाली. उत्तराखंडमध्ये सध्या चांगलीच थंडी आहे. त्यामुळे सकाळी मतदान अतिशय संथ गतीनं सुरु होतं. पण दुपारनंतर मतदानाला चांगला वेग आला. माजी मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल यांनी सर्वात आधी मतदान केलं. उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2012 05:37 PM IST

पंजाब 80 टक्के तर उत्तराखंडमध्ये 70 टक्के मतदान

30 जानेवारी

पंजाब आणि उत्तराखंडमध्ये आज विधानसभेसाठीचं मतदान झालं. पंजाबमध्ये जवळपास 80 टक्के मतदान झालं. काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झालं.लुधियानामध्ये भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसावर हल्ला करण्यात आला. तर भटिंडामध्ये डेरा सच्चा सौदाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. विधानसभेच्या 117 जागांसाठी 1,078 उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्येही आज मतदान झालं. तिथं 70 टक्के मतदानाची नोंद झाली. उत्तराखंडमध्ये सध्या चांगलीच थंडी आहे. त्यामुळे सकाळी मतदान अतिशय संथ गतीनं सुरु होतं. पण दुपारनंतर मतदानाला चांगला वेग आला. माजी मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल यांनी सर्वात आधी मतदान केलं. उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2012 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close