S M L

ज्येष्ठ संगीत संयोजक अनिल मोहिले यांचे निधन

01 फेब्रुवारी 2012ज्येष्ठ संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. 80 पेक्षाही जास्त हिंदी चित्रपटांचे संगीत संयोजन त्यांनी केलं होतं. अरूण पौडवाल यांच्यासोबत त्यांनी गंमत जंमतसारख्या मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं. व्हायोलिनसह अनेक वाद्यांवर त्यांचं प्रभूत्व होतं. मंगेशकर कुटुंबीयांचे अतिशय आवडते संगीत संयोजक होते. अभिमान, कयामत से कयामत तक, शराबी, डॉन अशा अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे संगीत संयोजन त्यांनी केलं होतं. वडिलांकडून त्यांना तरंगवाद्याचं बाळकडू मिळालं होतं. दे दणादण, थरथराट, धडाकेबाज अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांचे संगीत संयोजन त्यांचं होतं. भावसंगीत, लोकसंगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय अशा प्रत्येक प्रकारच्या संगीताचा त्यांचा अभ्यास होता. एस.डी.बर्मनपासून त्यांनी अनेक दिग्गज संगीतकारांसाठी संगीत संयोजन त्यांनी केलं होतं. अनेक तालवाद्यांवर त्यांचं प्रभुव होतं.नव्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याबाबत त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2012 09:15 AM IST

ज्येष्ठ संगीत संयोजक अनिल मोहिले यांचे निधन

01 फेब्रुवारी 2012

ज्येष्ठ संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. 80 पेक्षाही जास्त हिंदी चित्रपटांचे संगीत संयोजन त्यांनी केलं होतं. अरूण पौडवाल यांच्यासोबत त्यांनी गंमत जंमतसारख्या मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं. व्हायोलिनसह अनेक वाद्यांवर त्यांचं प्रभूत्व होतं. मंगेशकर कुटुंबीयांचे अतिशय आवडते संगीत संयोजक होते.

अभिमान, कयामत से कयामत तक, शराबी, डॉन अशा अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे संगीत संयोजन त्यांनी केलं होतं. वडिलांकडून त्यांना तरंगवाद्याचं बाळकडू मिळालं होतं. दे दणादण, थरथराट, धडाकेबाज अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांचे संगीत संयोजन त्यांचं होतं. भावसंगीत, लोकसंगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय अशा प्रत्येक प्रकारच्या संगीताचा त्यांचा अभ्यास होता. एस.डी.बर्मनपासून त्यांनी अनेक दिग्गज संगीतकारांसाठी संगीत संयोजन त्यांनी केलं होतं. अनेक तालवाद्यांवर त्यांचं प्रभुव होतं.नव्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याबाबत त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2012 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close