S M L

अन् कॅमेराला पाहून शिक्षक खिडक्यातून उड्या टाकून पळाले

01 फेब्रुवारीरायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात बळजबरीने शिक्षकांना उतरवलं जात असल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. शेतकरी कामगार पक्षाने शिक्षकांना बळजबरीने प्रचारात उतरवल्याची तक्रार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी केली. प्रचाराबद्दलच्या शिक्षकांच्या बैठकीची जागा ऐन वेळी बदलून शिक्षकांना एका मंदिरात नेऊन बैठक घेण्यात आली. शेकापचे उमेदवार आणि पदाधिकारी या बैठकीला हजर होते. अलिबागच्या काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी यांनी सहान इथल्या मंदिरात जाऊन या बैठकीचे व्हिडिओ शुटिंग केलं. पण शुटिंग होत असताना शिक्षकांनी मंदिरातल्या खिडक्यांमधून उड्या टाकून इथून पळ काढला. रायगडमध्ये या शिक्षकांना जबरदस्तीने पक्षाच्या प्रचारात उतरवले जात असल्याचा आरोप गोंधळी यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तक्रार करुन उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2012 10:44 AM IST

अन् कॅमेराला पाहून शिक्षक खिडक्यातून उड्या टाकून पळाले

01 फेब्रुवारी

रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात बळजबरीने शिक्षकांना उतरवलं जात असल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. शेतकरी कामगार पक्षाने शिक्षकांना बळजबरीने प्रचारात उतरवल्याची तक्रार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी केली. प्रचाराबद्दलच्या शिक्षकांच्या बैठकीची जागा ऐन वेळी बदलून शिक्षकांना एका मंदिरात नेऊन बैठक घेण्यात आली. शेकापचे उमेदवार आणि पदाधिकारी या बैठकीला हजर होते. अलिबागच्या काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी यांनी सहान इथल्या मंदिरात जाऊन या बैठकीचे व्हिडिओ शुटिंग केलं. पण शुटिंग होत असताना शिक्षकांनी मंदिरातल्या खिडक्यांमधून उड्या टाकून इथून पळ काढला. रायगडमध्ये या शिक्षकांना जबरदस्तीने पक्षाच्या प्रचारात उतरवले जात असल्याचा आरोप गोंधळी यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तक्रार करुन उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2012 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close