S M L

पुण्यात धुडगूस घालणार्‍या लष्करी जवानांवर गुन्हे दाखल

01 फेब्रुवारीपुण्यात लष्करी जवानांनी धुडगूस घालत वाहतूक पोलीस आणि सामान्य नागरिकांना मारहाण केल्याचा प्रकार काल मंगळवारी घडला होता. या सगळ्या आर्मी कॅडेट्सवर आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगल करणे, सरकारी कामात अडथळे निर्माण करणे, तसेच दरोड्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहे. पिंपरीतल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी आलेल्या 8 ते 10 लष्करी अधिकार्‍यांनी पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात धुडगूस घातला. लकडी पुलावरून दुचाकी वाहनांना परवानगी नसताना या लष्करी अधिकार्‍यांनी टू व्हीलर आणली, म्हणून पोलीस कॉन्स्टेबलनी त्यांना हटकलं. यावरून राग येऊन त्या जवानांनी नितेश टपके या पोलीस कॉन्सटेबलला जबर मारहाण केली. नितेशची सहाकरी लतिका मणेर यांनाही या अधिकार्‍यांनी मारहाण केली.पिंपरीतल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी आलेल्या 8 ते 10 लष्करी अधिकार्‍यांनी काल संध्याकाळी 7 च्या सुमारास अलका टॉकीज चौकात धुडगूस घातला. त्यांनंतर त्यांनी अलका टॉकीज चौकातल्या संभाजी पोलीस चौकीच्या काचा आणि टेबल्सची तोडफोड केली. हा सर्व प्रकार बघून तिथं गर्दी जमायला लागली. जमा होत असलेल्या नागरिकांनाही या अधिकार्‍यांनी मारहाण सुरू केली. अधिकारी असल्याने त्यांना सुरूवातीला फारसा कुणी विरोध केला नाही. नंतर तिथे माध्यमांची टीम दाखल झाली असता त्यांच्या हातातले कॅमेरे हिसकावून घेण्यात आले. महिला पत्रकारांना शिवीगाळ आणि दमबाजी केली. आणि त्या अधिकार्‍यांनी तिथून पळ काढला. नागरिकांची संख्या वाढल्यानंतर तिथं लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आले आणि त्या अधिकार्‍यांवर त्यांनी गुन्हा नोंदवला. या अधिका-यांवर कारवाई करण्याचं आश्वासन नंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2012 11:12 AM IST

पुण्यात धुडगूस घालणार्‍या लष्करी जवानांवर गुन्हे दाखल

01 फेब्रुवारी

पुण्यात लष्करी जवानांनी धुडगूस घालत वाहतूक पोलीस आणि सामान्य नागरिकांना मारहाण केल्याचा प्रकार काल मंगळवारी घडला होता. या सगळ्या आर्मी कॅडेट्सवर आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगल करणे, सरकारी कामात अडथळे निर्माण करणे, तसेच दरोड्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहे.

पिंपरीतल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी आलेल्या 8 ते 10 लष्करी अधिकार्‍यांनी पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात धुडगूस घातला. लकडी पुलावरून दुचाकी वाहनांना परवानगी नसताना या लष्करी अधिकार्‍यांनी टू व्हीलर आणली, म्हणून पोलीस कॉन्स्टेबलनी त्यांना हटकलं. यावरून राग येऊन त्या जवानांनी नितेश टपके या पोलीस कॉन्सटेबलला जबर मारहाण केली. नितेशची सहाकरी लतिका मणेर यांनाही या अधिकार्‍यांनी मारहाण केली.

पिंपरीतल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी आलेल्या 8 ते 10 लष्करी अधिकार्‍यांनी काल संध्याकाळी 7 च्या सुमारास अलका टॉकीज चौकात धुडगूस घातला. त्यांनंतर त्यांनी अलका टॉकीज चौकातल्या संभाजी पोलीस चौकीच्या काचा आणि टेबल्सची तोडफोड केली. हा सर्व प्रकार बघून तिथं गर्दी जमायला लागली. जमा होत असलेल्या नागरिकांनाही या अधिकार्‍यांनी मारहाण सुरू केली.

अधिकारी असल्याने त्यांना सुरूवातीला फारसा कुणी विरोध केला नाही. नंतर तिथे माध्यमांची टीम दाखल झाली असता त्यांच्या हातातले कॅमेरे हिसकावून घेण्यात आले. महिला पत्रकारांना शिवीगाळ आणि दमबाजी केली. आणि त्या अधिकार्‍यांनी तिथून पळ काढला. नागरिकांची संख्या वाढल्यानंतर तिथं लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आले आणि त्या अधिकार्‍यांवर त्यांनी गुन्हा नोंदवला. या अधिका-यांवर कारवाई करण्याचं आश्वासन नंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2012 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close