S M L

इजिप्तमध्ये फुटबॉल सामान्यात उसळली दंगल ; 74 ठार

02 फेब्रुवारीइजिप्तमध्ये एका फुटबॉल मॅच दरम्यान दंगल झाली आणि या दंगलीत तब्बल 74 लोकांचा मृत्यू झाला तर दीडशेहून जास्त लोक जखमी झाले आहे. पोर्ट सईद शहरात अल मरसी आणि अल अहाली या दोन क्लब दरम्यान फुटबॉल मॅच सुरु होती. आणि ही मॅच संपल्यावर विजेत्या टीमच्या पाठीराख्यांनी चक्क मैदानात घुसून दंगा सुरु केला. काही जणांकडे चाकूही होते. आणि पराभूत टीमच्या पाठीराख्यांवर त्यांनी दगड, बाटल्या आणि फटाके टाकायला सुरुवात केली. विशेष म्हणजे दंगलीचे हे लोण कैरो शहरातही लगेच पसरलं आहे. तिथंही एक फुटबॉल मॅच सुरु होती. आणि पोर्ट सईदमधल्या दंगलीची बातमी कळल्यावर रेफरींनी ही मॅच थांबवली. त्यानंतर कैरोतल्या स्टेडिअमवरही दंगल सुरु झाली. कैरोत तर प्रेक्षकांनी स्टेडिअमलाच आग पेटवून दिली. या दंगलीनंतर इजिप्त सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2012 12:24 PM IST

इजिप्तमध्ये फुटबॉल सामान्यात उसळली दंगल ; 74 ठार

02 फेब्रुवारी

इजिप्तमध्ये एका फुटबॉल मॅच दरम्यान दंगल झाली आणि या दंगलीत तब्बल 74 लोकांचा मृत्यू झाला तर दीडशेहून जास्त लोक जखमी झाले आहे. पोर्ट सईद शहरात अल मरसी आणि अल अहाली या दोन क्लब दरम्यान फुटबॉल मॅच सुरु होती. आणि ही मॅच संपल्यावर विजेत्या टीमच्या पाठीराख्यांनी चक्क मैदानात घुसून दंगा सुरु केला. काही जणांकडे चाकूही होते. आणि पराभूत टीमच्या पाठीराख्यांवर त्यांनी दगड, बाटल्या आणि फटाके टाकायला सुरुवात केली. विशेष म्हणजे दंगलीचे हे लोण कैरो शहरातही लगेच पसरलं आहे. तिथंही एक फुटबॉल मॅच सुरु होती. आणि पोर्ट सईदमधल्या दंगलीची बातमी कळल्यावर रेफरींनी ही मॅच थांबवली. त्यानंतर कैरोतल्या स्टेडिअमवरही दंगल सुरु झाली. कैरोत तर प्रेक्षकांनी स्टेडिअमलाच आग पेटवून दिली. या दंगलीनंतर इजिप्त सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2012 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close