S M L

शिवसैनिकांनी झेंडे जमा करुन केला पक्षाला रामराम

02 फेब्रुवारीमहापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. आणि आज पर्यंत जे घडले नाही अशी बंडखोरी झाली. याची सर्वात जास्त लागण झाली ती शिवसेनाला आणि आज पुण्यात पिंपरी चिचंवडमध्ये तिकीट नाकारण्यात आलेल्या नाराज शिवसैनिकांनी थेट खासदार आढळराव पाटील यांच्या कार्यालयावर धडक दिली. निष्ठावंताना डालवून पैसा घेवून नवख्यांना तिकीट वाटण्यात आल्याचा आरोप या शिवसैनिकांनी केला. कार्यालयात कुणीही पदाधिकारी उपस्थित नसल्यामुळे शिवसैनिकांनी शिवसेनेचे झेंडे कार्यालयापुढे जमा करुन पक्षाला कायमचा रामराम ठोकला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2012 02:52 PM IST

शिवसैनिकांनी झेंडे जमा करुन केला पक्षाला रामराम

02 फेब्रुवारी

महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. आणि आज पर्यंत जे घडले नाही अशी बंडखोरी झाली. याची सर्वात जास्त लागण झाली ती शिवसेनाला आणि आज पुण्यात पिंपरी चिचंवडमध्ये तिकीट नाकारण्यात आलेल्या नाराज शिवसैनिकांनी थेट खासदार आढळराव पाटील यांच्या कार्यालयावर धडक दिली. निष्ठावंताना डालवून पैसा घेवून नवख्यांना तिकीट वाटण्यात आल्याचा आरोप या शिवसैनिकांनी केला. कार्यालयात कुणीही पदाधिकारी उपस्थित नसल्यामुळे शिवसैनिकांनी शिवसेनेचे झेंडे कार्यालयापुढे जमा करुन पक्षाला कायमचा रामराम ठोकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2012 02:52 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close