S M L

बुलढाण्यात गावकर्‍यांचा निवडणुकीवर बहिष्कार

07 फेब्रुवारीबुलडाणा जिल्ह्यातल्या पाचला गावातल्या लोकांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. निवडणुका आल्या की आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात विकास मात्र नाही याचा निषेध करत गावकर्‍यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. पाचला गावाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. गावात साधा रस्तासुद्धा नाही. मुलांना नदीचे पाणी पायी ओलांडून शाळेत जावं लागतं. गावात आजही एस.टी बस येत नाही. यावर निषेध म्हणून गावकर्‍यांनी गावाबाहेरच निषेधाचा फलक लावला आहे. गावाबाहेर फलक लावून गावकर्‍यांनी सर्वच राजकीय पक्षांवर बंदी घातली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2012 09:30 AM IST

बुलढाण्यात गावकर्‍यांचा निवडणुकीवर बहिष्कार

07 फेब्रुवारी

बुलडाणा जिल्ह्यातल्या पाचला गावातल्या लोकांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. निवडणुका आल्या की आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात विकास मात्र नाही याचा निषेध करत गावकर्‍यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. पाचला गावाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. गावात साधा रस्तासुद्धा नाही. मुलांना नदीचे पाणी पायी ओलांडून शाळेत जावं लागतं. गावात आजही एस.टी बस येत नाही. यावर निषेध म्हणून गावकर्‍यांनी गावाबाहेरच निषेधाचा फलक लावला आहे. गावाबाहेर फलक लावून गावकर्‍यांनी सर्वच राजकीय पक्षांवर बंदी घातली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2012 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close