S M L

भाजपमधून 5 नगरसेवक, 1 पदाधिकारी निलंबित

07 फेब्रुवारीमुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या बंडखोर उमेदवार ज्योती अळवणी यांच्या प्रचारासाठी भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या पत्नी वर्षा तावडे गेल्याने भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यानंतर मुंबई शहराध्यक्ष राज पुरोहित यांनी कारवाईचा बडगा उगारलाय. या प्रचारात गेलेल्या पक्षाच्या 5 आजी माजी नगरसेवकांसह एका माजी पदाधिकार्‍याला निलंबित करण्यात आलं आहे. पराग अळवणी, जनक संघवी, अरविंद बने, विश्वास मस्के, जयश्री खरात,तर अरविंद परमार या माजी नगरसेवकासह सहा जणांना सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. स्वत: विनोद तावडेंच्या पत्नी या प्रचारात सहभागी झाल्यामुळे तावडेंची भूमिका काय, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2012 10:44 AM IST

भाजपमधून 5 नगरसेवक, 1 पदाधिकारी निलंबित

07 फेब्रुवारी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या बंडखोर उमेदवार ज्योती अळवणी यांच्या प्रचारासाठी भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या पत्नी वर्षा तावडे गेल्याने भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यानंतर मुंबई शहराध्यक्ष राज पुरोहित यांनी कारवाईचा बडगा उगारलाय. या प्रचारात गेलेल्या पक्षाच्या 5 आजी माजी नगरसेवकांसह एका माजी पदाधिकार्‍याला निलंबित करण्यात आलं आहे. पराग अळवणी, जनक संघवी, अरविंद बने, विश्वास मस्के, जयश्री खरात,तर अरविंद परमार या माजी नगरसेवकासह सहा जणांना सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. स्वत: विनोद तावडेंच्या पत्नी या प्रचारात सहभागी झाल्यामुळे तावडेंची भूमिका काय, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2012 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close