S M L

बीसीसीआय आणि सहारामध्ये समेट ?

07 फेब्रुवारीसहारा इंडियाने टीम इंडियाचे प्रायोजकत्व काढण्याचा निर्णय घेतला पण आता बीसीसीआय आणि सहारा यांच्यात समेट होण्याची शक्यता आता वाढली आहे. गेल्याच आठवड्यात सहारा कंपनीने भारतीय क्रिकेट टीमचं प्रायोजकत्व तडकाफडकी काढून घेतलं होतं. शिवाय आयपीएलमधली पुणे टीमही परत केली होती. सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी पत्रकार परिषद घेऊन बीसीसीआयविरुद्धचं आपलं गार्‍हाणं उघडपणे मांडलं होतं. सहारा कंपनी गेली 12 वर्षं भारतीय टीमची प्रायोजक होती. त्यामुळे या बातमीची चर्चाही सगळीकडे झाली. पण आता बीसीसीआय आणि सहारा दोघांनीही समेटाची तयारी दाखवली आहे. सहाराने प्रायोजकत्व काढून घेतलं तर बीसीसीआयचं दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयचीही समेटाची तयारी आहे. तर सहारानेही खेळाडूंचं नुकसान होऊ नये अशी भूमिका घेत माघारीची तयारी दाखवली आहे. आयपीएलच्या नियमांवर सहारा कंपनी खासकरुन नाराज होती. पण आता त्याचं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2012 12:54 PM IST

बीसीसीआय आणि सहारामध्ये समेट ?

07 फेब्रुवारी

सहारा इंडियाने टीम इंडियाचे प्रायोजकत्व काढण्याचा निर्णय घेतला पण आता बीसीसीआय आणि सहारा यांच्यात समेट होण्याची शक्यता आता वाढली आहे. गेल्याच आठवड्यात सहारा कंपनीने भारतीय क्रिकेट टीमचं प्रायोजकत्व तडकाफडकी काढून घेतलं होतं. शिवाय आयपीएलमधली पुणे टीमही परत केली होती. सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी पत्रकार परिषद घेऊन बीसीसीआयविरुद्धचं आपलं गार्‍हाणं उघडपणे मांडलं होतं. सहारा कंपनी गेली 12 वर्षं भारतीय टीमची प्रायोजक होती. त्यामुळे या बातमीची चर्चाही सगळीकडे झाली. पण आता बीसीसीआय आणि सहारा दोघांनीही समेटाची तयारी दाखवली आहे. सहाराने प्रायोजकत्व काढून घेतलं तर बीसीसीआयचं दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयचीही समेटाची तयारी आहे. तर सहारानेही खेळाडूंचं नुकसान होऊ नये अशी भूमिका घेत माघारीची तयारी दाखवली आहे. आयपीएलच्या नियमांवर सहारा कंपनी खासकरुन नाराज होती. पण आता त्याचं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2012 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close