S M L

...म्हणून मला न्यायालयाच पटत नाही - राज

08 फेब्रुवारीन्यायालय ज्या प्रकारे वागत आहे तेच पटत नाही मला त्यांनी जो निर्णय दिला आहे त्याचा कायद्याशी काही संबंध नाही, बसपाच्या मायवती यांनी हे पटवून सांगितले आहे त्यामुळे याला दिलं तर त्याला कसे देणार असा कसा न्याय ? अस प्रश्न उपस्थित करत राज यांनी आपली न्यायालयावरची नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली. आज राज ठाकरे यांनी पुण्यात निवडणूक प्रचाराचा नारळ फोडत रोड शो घेतला. यानंतर पत्रकार परिषद घेऊ न राज यांनी एकहाती सत्ता द्या असं आवाहन केलं.शिवाजी पार्कवर सभेसाठी मुंबई उच्च न्यायलयाने मनसेची याचिका फेटाळून लावली. यावर राज यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी देतात मग आम्हाला का देत नाही ? असा न्याय का असा सवाल राज यांनी उपस्थित केला होता. आज विद्येच्या माहेर घर पुण्यात राज ठाकरे यांनी सहकुटुंब प्रचाराला सुरुवात करत रोड शो घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना राज यांनी पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णायावर आपली नाराजी व्यक्त केली. तसेच न्यायालय ज्या प्रकारे वागत आहे तेच पटत नाही मला त्यांनी जो निर्णय दिला आहे त्याचा कायद्याशी काही संबंध नाही. याबद्दल मायावती यांनी दोनच दिवसापुर्वी हे स्पष्ट करुन दाखवले आहे. त्यामुळे याला दिलं तर त्याला कसे देणार असा कसा न्याय ? तसेच आम्ही सुप्रीम कोर्टात पण जाण्यासाठी तयार आहोत पण हायकोर्टाने पाच दिवस उलटले तरी याचिकेवर स्वाक्षरी केली नाही त्यामुळे आता जायाचे कसे ? ही काय कोर्टाची चांगली लक्षण आहे का ? कोर्टाने कायद्याच्या चौकटीत निर्णय द्यावा माझ्याबाजून दिला नाही तरी चालेल असा सल्लाही राज यांनी कोर्टाला देऊ केला. कोर्टाचा आदर मला पण आहे पण कोर्टाने तसा निर्णय द्यावा मग प्रश्नच येणार नाही असं ही राज यांनी म्हणाले. तसेच माझ्यासाठी उमेदवारीसाठी आलेली व्यक्ती महत्वाची आहे त्यामुळे उमेदवारीसाठी आलेल्या व्यक्तीवर कुठलाही गुन्हा नाही पण त्याचे नातेवाईक गुन्हेगार असतील तर त्याना तिकीट देण्यात गैर नाही असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2012 01:24 PM IST

...म्हणून मला न्यायालयाच पटत नाही - राज

08 फेब्रुवारीन्यायालय ज्या प्रकारे वागत आहे तेच पटत नाही मला त्यांनी जो निर्णय दिला आहे त्याचा कायद्याशी काही संबंध नाही, बसपाच्या मायवती यांनी हे पटवून सांगितले आहे त्यामुळे याला दिलं तर त्याला कसे देणार असा कसा न्याय ? अस प्रश्न उपस्थित करत राज यांनी आपली न्यायालयावरची नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली. आज राज ठाकरे यांनी पुण्यात निवडणूक प्रचाराचा नारळ फोडत रोड शो घेतला. यानंतर पत्रकार परिषद घेऊ न राज यांनी एकहाती सत्ता द्या असं आवाहन केलं.

शिवाजी पार्कवर सभेसाठी मुंबई उच्च न्यायलयाने मनसेची याचिका फेटाळून लावली. यावर राज यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी देतात मग आम्हाला का देत नाही ? असा न्याय का असा सवाल राज यांनी उपस्थित केला होता. आज विद्येच्या माहेर घर पुण्यात राज ठाकरे यांनी सहकुटुंब प्रचाराला सुरुवात करत रोड शो घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना राज यांनी पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णायावर आपली नाराजी व्यक्त केली. तसेच न्यायालय ज्या प्रकारे वागत आहे तेच पटत नाही मला त्यांनी जो निर्णय दिला आहे त्याचा कायद्याशी काही संबंध नाही. याबद्दल मायावती यांनी दोनच दिवसापुर्वी हे स्पष्ट करुन दाखवले आहे. त्यामुळे याला दिलं तर त्याला कसे देणार असा कसा न्याय ? तसेच आम्ही सुप्रीम कोर्टात पण जाण्यासाठी तयार आहोत पण हायकोर्टाने पाच दिवस उलटले तरी याचिकेवर स्वाक्षरी केली नाही त्यामुळे आता जायाचे कसे ? ही काय कोर्टाची चांगली लक्षण आहे का ? कोर्टाने कायद्याच्या चौकटीत निर्णय द्यावा माझ्याबाजून दिला नाही तरी चालेल असा सल्लाही राज यांनी कोर्टाला देऊ केला. कोर्टाचा आदर मला पण आहे पण कोर्टाने तसा निर्णय द्यावा मग प्रश्नच येणार नाही असं ही राज यांनी म्हणाले. तसेच माझ्यासाठी उमेदवारीसाठी आलेली व्यक्ती महत्वाची आहे त्यामुळे उमेदवारीसाठी आलेल्या व्यक्तीवर कुठलाही गुन्हा नाही पण त्याचे नातेवाईक गुन्हेगार असतील तर त्याना तिकीट देण्यात गैर नाही असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2012 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close