S M L

मुंबईकरांसाठी आघाडीचा जाहीरनामा प्रसिध्द

08 फेब्रुवारीमुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीनं आज आपला संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात आघाडीने मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. मराठी माणसाला खूश करण्यासाठी मराठी ग्रंथालयांना निधी देण्याचं आश्वासन दिले आहेत. मुंबईतला पाणीपुरवठा, वाहतुकीची कोंडी, झोपडपट्‌ट्यांचे पुनर्वसन, स्वच्छतागृह, यासारख्या प्रश्नांना आघाडीने जाहीरनाम्यात स्थान दिलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडेही उपस्थित होते. सत्ता द्या मुंबईचा चेहरामोहरा बदलू, असं आश्वासन आघाडीनं दिलं आहे. आघाडीचा जाहीरनामा- मराठी ग्रंथालयांना निधी देणार- मुंबईला खड्डेमुक्त करणार- मुंबईसाठी मुबलक पाणीपुरवठा- पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये हॉस्पिटल- वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठोस उपाय- मुंबईत 40,000 स्वच्छतागृहे उभारणार - वनजमिनीवरील 40,000 झोपडपट्‌ट्यांचे पुनर्वसन - 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण- झोपडपट्‌ट्यांसाठी सीआरझेडच्या नियमांना शिथिल करणार- मुंबई शहराचा पुन्हा सर्व्हे करणार- नालेसफाईसाठी ठेकेदारांना जबाबदार धरणार- प्रॉपर्टी टॅक्स कमी करणार- सर्व फुटपाथ मोकळे करणार- सर्व कामांसाठी एक खिडकी योजना राबवणार- विद्यार्थ्यांना बेस्टसाठी एक रुपया तिकीट

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2012 05:44 PM IST

मुंबईकरांसाठी आघाडीचा जाहीरनामा प्रसिध्द

08 फेब्रुवारी

मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीनं आज आपला संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात आघाडीने मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. मराठी माणसाला खूश करण्यासाठी मराठी ग्रंथालयांना निधी देण्याचं आश्वासन दिले आहेत. मुंबईतला पाणीपुरवठा, वाहतुकीची कोंडी, झोपडपट्‌ट्यांचे पुनर्वसन, स्वच्छतागृह, यासारख्या प्रश्नांना आघाडीने जाहीरनाम्यात स्थान दिलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडेही उपस्थित होते. सत्ता द्या मुंबईचा चेहरामोहरा बदलू, असं आश्वासन आघाडीनं दिलं आहे. आघाडीचा जाहीरनामा- मराठी ग्रंथालयांना निधी देणार- मुंबईला खड्डेमुक्त करणार- मुंबईसाठी मुबलक पाणीपुरवठा- पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये हॉस्पिटल- वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठोस उपाय- मुंबईत 40,000 स्वच्छतागृहे उभारणार - वनजमिनीवरील 40,000 झोपडपट्‌ट्यांचे पुनर्वसन - 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण- झोपडपट्‌ट्यांसाठी सीआरझेडच्या नियमांना शिथिल करणार

- मुंबई शहराचा पुन्हा सर्व्हे करणार- नालेसफाईसाठी ठेकेदारांना जबाबदार धरणार- प्रॉपर्टी टॅक्स कमी करणार- सर्व फुटपाथ मोकळे करणार- सर्व कामांसाठी एक खिडकी योजना राबवणार- विद्यार्थ्यांना बेस्टसाठी एक रुपया तिकीट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2012 05:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close