S M L

वन डेत भारताने उघडले विजयाचे खाते

08 फेब्रुवारीऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या वन डे ट्राय सीरिजमध्ये भारतीय टीमने अखेर पहिल्या विजयाची नोंद केली आहे. पर्थ वन डेत भारताने श्रीलंकेचा 4 विकेटने पराभव केला आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 234 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग झटपट आऊट झाला. पण सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने दुसर्‍या विकेटसाठी 74 रन्सची पार्टनरशिप करत इनिंग सावरली. सचिन 48 तर कोहली 77 रन्सवर आऊट झाले. श्रीलंकेच्या बॉलर्सनं भेदक बॉलिंग करत मधली फळी झटपट गुंडाळली आणि मॅचमध्ये चुरस निर्माण केली. पण यानंतर ऑलराऊंडर रविंद्र जडेजा आणि आर अश्विननं आणखी पडझड होऊ न देता भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2012 02:57 PM IST

वन डेत भारताने उघडले विजयाचे खाते

08 फेब्रुवारी

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या वन डे ट्राय सीरिजमध्ये भारतीय टीमने अखेर पहिल्या विजयाची नोंद केली आहे. पर्थ वन डेत भारताने श्रीलंकेचा 4 विकेटने पराभव केला आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 234 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग झटपट आऊट झाला. पण सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने दुसर्‍या विकेटसाठी 74 रन्सची पार्टनरशिप करत इनिंग सावरली. सचिन 48 तर कोहली 77 रन्सवर आऊट झाले. श्रीलंकेच्या बॉलर्सनं भेदक बॉलिंग करत मधली फळी झटपट गुंडाळली आणि मॅचमध्ये चुरस निर्माण केली. पण यानंतर ऑलराऊंडर रविंद्र जडेजा आणि आर अश्विननं आणखी पडझड होऊ न देता भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2012 02:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close