S M L

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासाला वेग येणार

21 नोव्हेंबर, मुंबई मालेगाव स्फोटातील 11 आरोपींना मोक्का लावल्यामुळे एटीएसच्या तपासाला हातभार लागणार आहे. फोन टॅपिंग, आरोपींचा कबुली जबाब हे आता पुरावे म्हणून ग्राह्य धरले जातील तर स्फोटाचा मुख्य सूत्रधार रामजी कलसंगरा आणि सुनील डांगे हे फरार आहेत. हे आरोपी भोपाळ, इंदूर, पुणे आणि मुंबई या शहरातले आहेत. एटीएसच्या जाळ्यात आतापर्यंत 11 आरोपी सापडलेत. पहिली आरोपी साध्वी प्रज्ञासिंग. ही हिंदू राष्ट्र जागरण मंचाची संस्थापक अध्यक्ष आहे. स्फोटात वापरण्यात आलेल्या गाडीची मालक असल्याचा तिच्यावर आरोप आहे. दुसरा आणि चर्चेतला आरोपी निलंबित लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित. मालेगाव स्फोटाचा मास्टरमाईंड. मिलिटरी इंटेलिजन्समध्ये काम करत होता. 2006 मध्ये त्याचं देवळालीमध्ये पोस्टिंग होतं. लष्करातलं आरडीएक्स स्फोटात वापरल्याचा त्याच्यावर संशय आहे. दयानंद पांडे उर्फ सुधाकर द्विवेदी. जम्मूमधील शारदा सर्वज्ञ पीठाचा स्वयंघोषित शंकराचार्य. स्वामी अमृतानंद देव हेही एक नाव.स्फोटासाठी चिथावणी दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. शिवनारायण कलसंगरा हा अभिनव भारतचा कार्यकर्ता आहे. स्फोटात वापरलेली गाडी वापरत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्या घरातून 4 इम्पोर्टेड वेपन्स, 2 इलेक्ट्रॉनिक टायमर जप्त करण्यात आले आहेत. पाचवा आरोपी श्यामलाल साहू हा अभिनव भारतचा कार्यकर्ता आहे. रामजीनं त्याच्याकडून सीमकार्डस खरेदी केली. त्यातलं एक सीमकार्ड साध्वी प्रज्ञासिंगच्या वापरात होतं. एटीएसनं अभिनव भारतचा मुख्य प्रचारक समीर कुलकर्णी यालाही अटक केलीय. हा स्फोटासंबंधीच्या बैठकींना हजर होता. पुण्याजवळच्या खडकीमध्ये चर्चच्या फादरला धमकावल्याचा गुन्हाही त्याच्यावर आहे. सातवा आरोपी रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय. हा अभिनव भारतचा कार्याध्यक्ष. देवळालीच्या आर्टिलरी सेंटरमध्ये 20 वर्षं नोकरी केली. त्यानं बॉम्ब बनवण्याची माहिती पुरवली आणि कटासंबंधीच्या बैठकीतही तो हजर होता, असं उघड झालंय. या स्फोटातील आणखी एक आरोपी अजय राहीरकर हा अभिनव भारतचा खजिनदार आहे. पुरोहितच्या सूचनेवरून स्फोटासाठी 10 लाखांवर रकमांचं वाटप केल्याचा आरोप. बनावट शस्त्रास्त्रांचा उत्पादक आणि संग्राहक राकेश धावडेही एटीएसच्या जाळ्यात सापडलाय. त्याच्याकडून 4 इम्पोर्टेड वेपन्स आणि रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले आहेत. पूर्णा, नांदेड आणि परभणी स्फोटातही चौकशी सुरू आहे. दहावा आरोपी जगदीश म्हात्रे. त्याच्यावर शस्त्रास्त्र खरेदीचा आरोप आहे. अकरावा आरोपी सुधाकर चतुर्वेदीला लष्कराच्या बनावट आयकार्डसह मुंबईत अटक करण्यात आली. हाही अभिनव भारतचा कार्यकर्ता आहे. पुरोहितच्या सूचनांवरून देवळालीतून कारवाया केल्या. याशिवाय रामजी कलसंगरा आणि सुनील डांगे हे आरोपी फरार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2008 04:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2008 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close