S M L

शिवसेनाप्रमुख आज ठाणेकरांच्या भेटीला

11 फेब्रुवारीमहापालिका प्रचारामध्ये सगळ्याच पक्षांचे दिग्गज नेते आता उतरले आहेत. त्यांच्या एकमेकांवरच्या हल्ल्या - प्रतिहल्ल्याने प्रचारसुद्धा रंगू लागला आहे. त्यातच आज बहुतेक सगळ्याच दिग्गज नेत्यांच्या सभा होत आहेत. त्यामुळे मतदारांना खमंग मेजवानी मिळणार हे नक्की आहे. आज सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाची...विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच बाळासाहेबांची जाहीर सभा होत आहे. आज ठाण्यातल्या सेंट्रल मैदानात संध्याकाळी 7 वाजता बाळासाहेब ठाकरे सभा घेणार आहेत.विशेष म्हणजे तब्बल 45 वर्षानंतर बाळासाहेब आपल्या ठाणेकरांना भेटायला येत आहे. शिवसेनेचा पहिला विजय हा बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला होता. त्यामुळे शिवसेनेचं ठाणे...ठाण्याची शिवसेना असं समिकरण जोडलं जातं. तर राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. संध्याकाळी 6 वाजता पुण्यातील भिडे पूल येथील सर्कस ग्राऊंडवर सभा होत आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचीही आज संध्याकाळी 6 वाजता पुण्यातच गोखले नगरला सभा होत आहे. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. मुख्यमंत्री नागपूर, अमरावती आणि अकोल्यात जाहीर सभा घेणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचीही आज नागपूरात सभा होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 11, 2012 11:19 AM IST

शिवसेनाप्रमुख आज ठाणेकरांच्या भेटीला

11 फेब्रुवारी

महापालिका प्रचारामध्ये सगळ्याच पक्षांचे दिग्गज नेते आता उतरले आहेत. त्यांच्या एकमेकांवरच्या हल्ल्या - प्रतिहल्ल्याने प्रचारसुद्धा रंगू लागला आहे. त्यातच आज बहुतेक सगळ्याच दिग्गज नेत्यांच्या सभा होत आहेत. त्यामुळे मतदारांना खमंग मेजवानी मिळणार हे नक्की आहे. आज सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाची...विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच बाळासाहेबांची जाहीर सभा होत आहे. आज ठाण्यातल्या सेंट्रल मैदानात संध्याकाळी 7 वाजता बाळासाहेब ठाकरे सभा घेणार आहेत.विशेष म्हणजे तब्बल 45 वर्षानंतर बाळासाहेब आपल्या ठाणेकरांना भेटायला येत आहे. शिवसेनेचा पहिला विजय हा बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला होता. त्यामुळे शिवसेनेचं ठाणे...ठाण्याची शिवसेना असं समिकरण जोडलं जातं. तर राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. संध्याकाळी 6 वाजता पुण्यातील भिडे पूल येथील सर्कस ग्राऊंडवर सभा होत आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचीही आज संध्याकाळी 6 वाजता पुण्यातच गोखले नगरला सभा होत आहे. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. मुख्यमंत्री नागपूर, अमरावती आणि अकोल्यात जाहीर सभा घेणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचीही आज नागपूरात सभा होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2012 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close