S M L

शिवसेनेनं केलेल्या घोटाळ्याची चौकशी करावी - पवार

10 फेब्रुवारीमुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप युतीने 40 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. आता या आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये ही मागणी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपुर्वी आयबीएन लोकमतला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेचं 21 हजार कोटी बजेट आहे आणि 65 टक्के हे कर्मचार्‍यांच्या पगारावर खर्च होती आणि आमच्या हातात काही राहत नाही आम्ही करणार तरी काय ? असा दावा शिवसेनेनं केला असा प्रश्न विचारला असता. यावर राज यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. 21 हजार कोटीपैंकी 65 टक्के पगारावर खर्च होतं आहे बरं त्यातून एक आठ हजार कोटी उरले आणि गेल्या पाचवर्षाचा हिशेब पाहिला तर तो आकडा होता 40 हजार कोटी मग प्रश्न असा आहे की हे 40 हजार कोटी गेले कुठे ? ही रक्कम आता दाखवा ? प्रत्येक वेळी सांगायचे की प्रशासनावर खर्च केले तर शहरावर काय केले ? याचा अर्थ स्पष्ट होतो की हे पैसे त्यांच्या नेत्यांच्या आणि कंत्राटदारांच्या खिशात गेले आहे असा थेट आरोप राज यांनी शिवसेनेवर केला. राज यांच्या आरोपाचा धाग पकडत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. तसेच यंदा पालिकेवर आघाडीचाच झेंडा फडकेल असा विश्वासही व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2012 10:08 AM IST

शिवसेनेनं केलेल्या घोटाळ्याची चौकशी करावी - पवार

10 फेब्रुवारी

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप युतीने 40 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. आता या आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये ही मागणी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपुर्वी आयबीएन लोकमतला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेचं 21 हजार कोटी बजेट आहे आणि 65 टक्के हे कर्मचार्‍यांच्या पगारावर खर्च होती आणि आमच्या हातात काही राहत नाही आम्ही करणार तरी काय ? असा दावा शिवसेनेनं केला असा प्रश्न विचारला असता. यावर राज यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. 21 हजार कोटीपैंकी 65 टक्के पगारावर खर्च होतं आहे बरं त्यातून एक आठ हजार कोटी उरले आणि गेल्या पाचवर्षाचा हिशेब पाहिला तर तो आकडा होता 40 हजार कोटी मग प्रश्न असा आहे की हे 40 हजार कोटी गेले कुठे ? ही रक्कम आता दाखवा ? प्रत्येक वेळी सांगायचे की प्रशासनावर खर्च केले तर शहरावर काय केले ? याचा अर्थ स्पष्ट होतो की हे पैसे त्यांच्या नेत्यांच्या आणि कंत्राटदारांच्या खिशात गेले आहे असा थेट आरोप राज यांनी शिवसेनेवर केला. राज यांच्या आरोपाचा धाग पकडत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. तसेच यंदा पालिकेवर आघाडीचाच झेंडा फडकेल असा विश्वासही व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2012 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close