S M L

2003 मुंबई स्फोटातील 3 आरोपींची फाशी कायम

10 फेब्रुवारीमुंबईत 2003 साली गेट वे आँफ इंडिया आणि झवेेरी बाजार येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अशरत अन्सारी , हनिफ अनिस आणि फैमिदा सय्यद यांना आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.25 ऑगस्ट 2003 रोजी गेट वे आँफ इंडिया आणि झवेेरी बाजार येथे बॉम्बस्फोटाने मुंबई हादरुन गेली होती. दोन टँक्सीतून हे बॉम्ब ठेवण्यात आले होते.या बॉम्ब स्फोटात 52 जण ठार झाले होते तर अनेक जण जखमी झाले होते. हे स्फोट अशरत अन्सारी, हनिफ सय्य्द आणि फैम्दा सय्यद यांनी घडवून आणले होते. या स्फोटानंतर तीनही आरोपींवर विशेष पोटा कोर्टात सुनावणी झाली. आणि 4 ऑगस्ट 2009 रोेजी तीन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेविरोधात आरोपींनी कोर्टात अपिल केलं. तर दुसरीकडे सरकारच्यावतीने फाशीची शिक्षा कायम करावी म्हणून अर्ज करण्यात आला होता. या प्रकरणावर गेली दीड वर्ष सुनावणी सुरु होती अखेर आज शुक्रवारी कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देत तिन्ही आरोपींची शिक्षा कायम ठेवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2012 12:05 PM IST

2003 मुंबई स्फोटातील 3 आरोपींची फाशी कायम

10 फेब्रुवारी

मुंबईत 2003 साली गेट वे आँफ इंडिया आणि झवेेरी बाजार येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अशरत अन्सारी , हनिफ अनिस आणि फैमिदा सय्यद यांना आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

25 ऑगस्ट 2003 रोजी गेट वे आँफ इंडिया आणि झवेेरी बाजार येथे बॉम्बस्फोटाने मुंबई हादरुन गेली होती. दोन टँक्सीतून हे बॉम्ब ठेवण्यात आले होते.या बॉम्ब स्फोटात 52 जण ठार झाले होते तर अनेक जण जखमी झाले होते. हे स्फोट अशरत अन्सारी, हनिफ सय्य्द आणि फैम्दा सय्यद यांनी घडवून आणले होते. या स्फोटानंतर तीनही आरोपींवर विशेष पोटा कोर्टात सुनावणी झाली. आणि 4 ऑगस्ट 2009 रोेजी तीन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेविरोधात आरोपींनी कोर्टात अपिल केलं. तर दुसरीकडे सरकारच्यावतीने फाशीची शिक्षा कायम करावी म्हणून अर्ज करण्यात आला होता. या प्रकरणावर गेली दीड वर्ष सुनावणी सुरु होती अखेर आज शुक्रवारी कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देत तिन्ही आरोपींची शिक्षा कायम ठेवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2012 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close