S M L

मतांसाठी उमेदवारांनी लावला कामांचा सपाटा !

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड11 फेब्रुवारीनिवडणुकीच्या काळात सोसायट्यांमध्ये विकासकामं केली तर आपल्याला एकगठ्ठा मतं मिळतील असं उमेदवारांना वाटतंय. त्यामुळेच पिंपरीतल्या सोसायट्यांचं नुतनीकरण करण्याचा सपाटा उमेदवारांनी लावला आहे. फक्त मुंबईतच नाही तर राज्यात इतर ठिकाणीही हीच परिस्थिती आहे. मतांसाठी मॅनेजमेंट केली जात आहे.पेव्हींग ब्लॉक बसवून तयार केलेल हे रस्ते, सोसायट्यांध्ये उभारण्यात आलेले बोरवेल आणि शेकडो नागरीक राहत असलेल्या सोसायट्याच्या रंगीत इमारती ही दृश्यं पिंपरी-चिंचवड शहरातील कुठल्याही वार्डात गेलं तर हमकास बघायला मिळतात. परंतु शहरात सुरु असलेला हा विकास महापालिका करत नसुन इच्छुक उमेदवार हा खर्च करत आहे.शहरातील झोपडपट्यामंध्येही अशाच प्रकारची विकास कामं केली जात आहेत. कारण सोसायटी नंतर एकगठ्ठा मतदान मिळण्याचं दुसर स्थान म्हणजे ह्या झोपडपट्या. सोसायटी व झोपडपट्टीमंध्ये अश्या प्रकारची विकास कामे करण्यासाठी दहा ते बारा लाखाचा खर्च लागतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार करत असलेली ही विकास कामे काळ्या पैश्यातून होत असल्याचा आरेाप विरोधकांनी केलाय तर अशी कामे करण्यात काहीही गैर नसल्याचे सत्ताधार्‍यांना वाटतं आहे.मतांच्या राजकारणापोटी इच्छुक उमेदवार लाखो रुपये खर्च करतायत, तर दुसरीकडे स्वत:चा फायदा करुन घेण्यासाठी फुकटात कामं करुन घेणारा पिंपरीतील मतदारही विकल्या जातोय की काय असा प्रश्न पडतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 11, 2012 02:13 PM IST

मतांसाठी उमेदवारांनी लावला कामांचा सपाटा !

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड

11 फेब्रुवारी

निवडणुकीच्या काळात सोसायट्यांमध्ये विकासकामं केली तर आपल्याला एकगठ्ठा मतं मिळतील असं उमेदवारांना वाटतंय. त्यामुळेच पिंपरीतल्या सोसायट्यांचं नुतनीकरण करण्याचा सपाटा उमेदवारांनी लावला आहे. फक्त मुंबईतच नाही तर राज्यात इतर ठिकाणीही हीच परिस्थिती आहे. मतांसाठी मॅनेजमेंट केली जात आहे.

पेव्हींग ब्लॉक बसवून तयार केलेल हे रस्ते, सोसायट्यांध्ये उभारण्यात आलेले बोरवेल आणि शेकडो नागरीक राहत असलेल्या सोसायट्याच्या रंगीत इमारती ही दृश्यं पिंपरी-चिंचवड शहरातील कुठल्याही वार्डात गेलं तर हमकास बघायला मिळतात. परंतु शहरात सुरु असलेला हा विकास महापालिका करत नसुन इच्छुक उमेदवार हा खर्च करत आहे.

शहरातील झोपडपट्यामंध्येही अशाच प्रकारची विकास कामं केली जात आहेत. कारण सोसायटी नंतर एकगठ्ठा मतदान मिळण्याचं दुसर स्थान म्हणजे ह्या झोपडपट्या. सोसायटी व झोपडपट्टीमंध्ये अश्या प्रकारची विकास कामे करण्यासाठी दहा ते बारा लाखाचा खर्च लागतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार करत असलेली ही विकास कामे काळ्या पैश्यातून होत असल्याचा आरेाप विरोधकांनी केलाय तर अशी कामे करण्यात काहीही गैर नसल्याचे सत्ताधार्‍यांना वाटतं आहे.

मतांच्या राजकारणापोटी इच्छुक उमेदवार लाखो रुपये खर्च करतायत, तर दुसरीकडे स्वत:चा फायदा करुन घेण्यासाठी फुकटात कामं करुन घेणारा पिंपरीतील मतदारही विकल्या जातोय की काय असा प्रश्न पडतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2012 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close