S M L

प्रचार रॅलीत शॉक लागून 4 जणांचा मृत्यू

12 फेब्रुवारीठाण्याजवळच्या कळवा इथं राष्ट्रवादीच्या रॅली करता कळव्याच्या शिवाजीनगर इथं तयारी सुरु होती. यावेळी शॉक लागून चार जण ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. झेंडे हातात घेऊन नाचत असतानाच एका तरुणाने हातात घेतलेल्या झेंड्याच्या लोखंडी रॉडचा स्पर्श हाय व्होल्टेज वायरला झाला. त्यामुळे त्याला जबरदस्त शॉक लागला. यावेळी त्याला वाचवायला गेलेल्या इतर तिघा तरुणांनांही शॉक बसला. आणि जागेवरच या 4 जणांचा मृत्यू झाला. प्रदिप गुप्ता, अजय पहाडीराजा ,अनिल पहाडीराजा यांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना ठाणे राष्ट्रवादीकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत पालकमंत्री गणेश नाईक यांनीही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी अडीच लाखांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत 7जणही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2012 12:10 PM IST

प्रचार रॅलीत शॉक लागून 4 जणांचा मृत्यू

12 फेब्रुवारी

ठाण्याजवळच्या कळवा इथं राष्ट्रवादीच्या रॅली करता कळव्याच्या शिवाजीनगर इथं तयारी सुरु होती. यावेळी शॉक लागून चार जण ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. झेंडे हातात घेऊन नाचत असतानाच एका तरुणाने हातात घेतलेल्या झेंड्याच्या लोखंडी रॉडचा स्पर्श हाय व्होल्टेज वायरला झाला. त्यामुळे त्याला जबरदस्त शॉक लागला. यावेळी त्याला वाचवायला गेलेल्या इतर तिघा तरुणांनांही शॉक बसला. आणि जागेवरच या 4 जणांचा मृत्यू झाला. प्रदिप गुप्ता, अजय पहाडीराजा ,अनिल पहाडीराजा यांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना ठाणे राष्ट्रवादीकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत पालकमंत्री गणेश नाईक यांनीही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी अडीच लाखांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत 7जणही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2012 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close