S M L

भारताचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय

12 फेब्रुवारीटेस्टमध्ये व्हाईटवॉश आणि वन डेच्या पहिल्याच सामान्यात लाजिरवाना पराभवाचं घोंगड बाजूला फेकून अखेर आज ऍडलेड वन डेत चुरशीच्या लढतीत भारताने कांगारुंना धुळ चारली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट राखून पराभव केला आहेत. पहिली बॅटिंग करणार्‍या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 270 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेला वीरेंद्र सेहवाग 20 रन्सवर तर तिसर्‍या क्रमांकावर आलेला विराट कोहली 18 रन्स करुन आऊट झाला. पण यानंतर गौतम गंभीर आणि रोहित शर्माने दमदार बॅटिंग करत इनिंग सावरली. गौतम गंभीरची सेंच्युरी मात्र पूर्ण होऊ शकली नाही. गंभीर 92 रन्सवर आऊट झाला. पण यानंतर महेंद्रसिंग धोणीने कॅप्टन इनिंग खेळत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अखेरच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 13 रन्सची गरज होती. धोणीनं 1 सिक्स आणि 1 फोर मारत भारताला शानदार विजय मिळवून दिला. ट्राय सीरिजमध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2012 11:27 AM IST

भारताचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय

12 फेब्रुवारी

टेस्टमध्ये व्हाईटवॉश आणि वन डेच्या पहिल्याच सामान्यात लाजिरवाना पराभवाचं घोंगड बाजूला फेकून अखेर आज ऍडलेड वन डेत चुरशीच्या लढतीत भारताने कांगारुंना धुळ चारली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट राखून पराभव केला आहेत. पहिली बॅटिंग करणार्‍या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 270 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेला वीरेंद्र सेहवाग 20 रन्सवर तर तिसर्‍या क्रमांकावर आलेला विराट कोहली 18 रन्स करुन आऊट झाला. पण यानंतर गौतम गंभीर आणि रोहित शर्माने दमदार बॅटिंग करत इनिंग सावरली. गौतम गंभीरची सेंच्युरी मात्र पूर्ण होऊ शकली नाही. गंभीर 92 रन्सवर आऊट झाला. पण यानंतर महेंद्रसिंग धोणीने कॅप्टन इनिंग खेळत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अखेरच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 13 रन्सची गरज होती. धोणीनं 1 सिक्स आणि 1 फोर मारत भारताला शानदार विजय मिळवून दिला. ट्राय सीरिजमध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2012 11:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close