S M L

निवडणूक प्रचार संपला आता फैसला जनतेचा

14 फेब्रुवारीराज्यात 10 महापालिकेसाठीचा निवडणूक प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून निवडणूक प्रचार जोरात सुरु होता. गेल्या आठवड्यात नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपानं प्रचारात अजूनच रंगत आली. मुंबई आणि ठाण्यात बाळासाहेबांच्या दोन प्रचार सभा झाल्या. तर राज ठाकरे यांनी पुणे, नाशिक, मुंबई आणि ठाण्यात जंगी प्रचारसभा घेतल्या. याशिवाय राज ठाकरे, उध्दव ठाकरे यांनी रोड शो केले. या रोड शोला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्र्यानीही रोड शोचा मार्ग पत्करला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुंबई, ठाणे आणि पुण्यात सभा घेतल्या. महायुतीतर्फे आठवले यांच्या कविताने प्रचारात रंगत आणली. भाजपतर्फे नितीन गडकरी यांनी केवळ नागपूरात प्रचार सभा घेतल्या. नारायण राणे यांनी प्रचारादरम्यान अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी निवडणूक लढत असलेल्या उमेदवारांनी अखेरच्या दिवशी रॅली काढून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्यामुळे सगळ्याच पक्षांनी रॅली आणि रोड शोवर भर दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे नेत्या शर्मिला ठाकरे, विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांनी आपापल्या पक्षासाठी प्रचार केला. मनसेचे अमृत सोनवणे यांची रॅली लक्षवेधी ठरली. अमृत सोनवणे हे मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्यासारखेच हुबेहुब दिसत असल्यामुळे सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे आता लक्ष लागले आहे जनता काय फैसला देते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2012 11:05 AM IST

निवडणूक प्रचार संपला आता फैसला जनतेचा

14 फेब्रुवारी

राज्यात 10 महापालिकेसाठीचा निवडणूक प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून निवडणूक प्रचार जोरात सुरु होता. गेल्या आठवड्यात नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपानं प्रचारात अजूनच रंगत आली. मुंबई आणि ठाण्यात बाळासाहेबांच्या दोन प्रचार सभा झाल्या. तर राज ठाकरे यांनी पुणे, नाशिक, मुंबई आणि ठाण्यात जंगी प्रचारसभा घेतल्या. याशिवाय राज ठाकरे, उध्दव ठाकरे यांनी रोड शो केले. या रोड शोला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्र्यानीही रोड शोचा मार्ग पत्करला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुंबई, ठाणे आणि पुण्यात सभा घेतल्या. महायुतीतर्फे आठवले यांच्या कविताने प्रचारात रंगत आणली. भाजपतर्फे नितीन गडकरी यांनी केवळ नागपूरात प्रचार सभा घेतल्या. नारायण राणे यांनी प्रचारादरम्यान अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला.

तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी निवडणूक लढत असलेल्या उमेदवारांनी अखेरच्या दिवशी रॅली काढून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्यामुळे सगळ्याच पक्षांनी रॅली आणि रोड शोवर भर दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे नेत्या शर्मिला ठाकरे, विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांनी आपापल्या पक्षासाठी प्रचार केला. मनसेचे अमृत सोनवणे यांची रॅली लक्षवेधी ठरली. अमृत सोनवणे हे मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्यासारखेच हुबेहुब दिसत असल्यामुळे सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे आता लक्ष लागले आहे जनता काय फैसला देते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2012 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close