S M L

बीसीसीआयच्या बैठकीत बे'सहारा'च प्रश्न

13 फेब्रुवारीबीसीसीआयची चेन्नईतली वार्षिक सर्वसाधारण सभेतही सहाराच्या प्रायोजकत्वाचा प्रश्न जैसे थे च आहे. मात्र बीसीसीआयने सहारा कंपनीकडे समझोत्याचा हात पुढे केला आहे. सहारा कंपनीच्या ज्या तक्रारी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न बीसीसीआय करेल असं अध्यक्ष श्रीनिवासन यांनी म्हटलं आहे. शिवाय पुणे आयपीएल टीमला युवराज सिंगच्या तोलामोलाचा बदली खेळाडू मिळेल अशी व्यवस्था करण्याचे आश्वासनही बीसीसीआयने दिलं आहे. एका टीमसाठी स्पर्धेचे नियम मात्र बदलता येणार नाहीत असंही श्रीनिवासन यांनी म्हटलं आहे. गेली 12 वर्ष टीम इंडियाचे प्रायोजक असलेल्या सहाराने तडकाफडकी प्रायोजकत्व काढून घेतले आणि बीसीसीआय एकदम क्लिन बोल्ड झाली. पुणे वॉरियरर्सचा तडाखेबाज कॅप्टन युवराज सिंग यांच्यावरुन सहाराने काही सुचना केल्या होत्या पण त्या पूर्ण होऊ शकल्या नाही. अखेर या वादामुळे टीम इंडियावर बे'सहारा' होण्याची नामुष्की आली. याची घोषणा खुद्द सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी करुन टाकली. मात्र या घोषणेनंतर दोन दिवसानंतर समेट होण्याचे वारे वाहु लागले. सहाराने प्रायोजकत्व काढून घेतलं तर बीसीसीआयचं दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयचीही समेटाची तयारी आहे. तर सहारानेही खेळाडूंचं नुकसान होऊ नये अशी भूमिका घेत माघारीची तयारी दाखवली आहे. आयपीएलच्या नियमांवर सहारा कंपनी खासकरुन नाराज होती. पण आता त्याचं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. पण आज झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत एका टीमसाठी स्पर्धेचे नियम मात्र बदलता येणार नाहीत असंही श्रीनिवासन यांनी स्पष्ट केलं आहे. पण त्याचबरोबर सहाराच्या तक्रारी समजून घेऊन त्यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे. शिवाय पुणे आयपीएल टीमला युवराज सिंगच्या तोलामोलाचा बदली खेळाडू मिळेल अशी व्यवस्था करण्याचे आश्वासनही बीसीसीआयने दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 13, 2012 11:53 AM IST

बीसीसीआयच्या बैठकीत बे'सहारा'च प्रश्न

13 फेब्रुवारी

बीसीसीआयची चेन्नईतली वार्षिक सर्वसाधारण सभेतही सहाराच्या प्रायोजकत्वाचा प्रश्न जैसे थे च आहे. मात्र बीसीसीआयने सहारा कंपनीकडे समझोत्याचा हात पुढे केला आहे. सहारा कंपनीच्या ज्या तक्रारी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न बीसीसीआय करेल असं अध्यक्ष श्रीनिवासन यांनी म्हटलं आहे. शिवाय पुणे आयपीएल टीमला युवराज सिंगच्या तोलामोलाचा बदली खेळाडू मिळेल अशी व्यवस्था करण्याचे आश्वासनही बीसीसीआयने दिलं आहे. एका टीमसाठी स्पर्धेचे नियम मात्र बदलता येणार नाहीत असंही श्रीनिवासन यांनी म्हटलं आहे.

गेली 12 वर्ष टीम इंडियाचे प्रायोजक असलेल्या सहाराने तडकाफडकी प्रायोजकत्व काढून घेतले आणि बीसीसीआय एकदम क्लिन बोल्ड झाली. पुणे वॉरियरर्सचा तडाखेबाज कॅप्टन युवराज सिंग यांच्यावरुन सहाराने काही सुचना केल्या होत्या पण त्या पूर्ण होऊ शकल्या नाही. अखेर या वादामुळे टीम इंडियावर बे'सहारा' होण्याची नामुष्की आली. याची घोषणा खुद्द सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी करुन टाकली. मात्र या घोषणेनंतर दोन दिवसानंतर समेट होण्याचे वारे वाहु लागले.

सहाराने प्रायोजकत्व काढून घेतलं तर बीसीसीआयचं दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयचीही समेटाची तयारी आहे. तर सहारानेही खेळाडूंचं नुकसान होऊ नये अशी भूमिका घेत माघारीची तयारी दाखवली आहे. आयपीएलच्या नियमांवर सहारा कंपनी खासकरुन नाराज होती. पण आता त्याचं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.

पण आज झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत एका टीमसाठी स्पर्धेचे नियम मात्र बदलता येणार नाहीत असंही श्रीनिवासन यांनी स्पष्ट केलं आहे. पण त्याचबरोबर सहाराच्या तक्रारी समजून घेऊन त्यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे. शिवाय पुणे आयपीएल टीमला युवराज सिंगच्या तोलामोलाचा बदली खेळाडू मिळेल अशी व्यवस्था करण्याचे आश्वासनही बीसीसीआयने दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2012 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close