S M L

फलटणमधील इव्हीएम मशीनमध्ये छेडछाड नाही !

14 फेब्रुवारीफलटणमधील इव्हीएम मशीनच्या पेटींना असणारे पत्ते गहाळ झाले होते. ही गंभीर बाब काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आणि उमेदवारींनी निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याची दखल घेत निवडणूक आयोगाने दोन सदस्यांची कमिटी याची तपासणी करण्यासाठी पाठवली होती. पण अखेर या दोन सदस्यांनी केलेल्या तपासणीमध्ये कोणताही फेरफार झाला नसल्याचा निर्वाळा या कमिटी सदस्यांनी दिला आहे. तर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी ही तपासणी योग्य पध्दतीने झाली नसल्याचे आरोप केला आहे. मुधोजी विद्यालयात ही इव्हीएस मशीन ठेवण्यात आली होती. 11 तारखेला इव्हीएम मशिन्सच्या कुलुपाला लावलेल्या स्लिप्स शाळेच्या मैदानात सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. आणि विशेष या स्लीपवर उमेदवारांची सही होती. काँग्रेसच्या स्थानिक उमेदवारांनी याबाबत आक्षेप घेतला आहे इव्हीएम मशीनसोबत छेडछाड केल्याचा संशयही व्यक्त केला तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2012 12:15 PM IST

फलटणमधील इव्हीएम मशीनमध्ये छेडछाड नाही !

14 फेब्रुवारी

फलटणमधील इव्हीएम मशीनच्या पेटींना असणारे पत्ते गहाळ झाले होते. ही गंभीर बाब काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आणि उमेदवारींनी निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याची दखल घेत निवडणूक आयोगाने दोन सदस्यांची कमिटी याची तपासणी करण्यासाठी पाठवली होती. पण अखेर या दोन सदस्यांनी केलेल्या तपासणीमध्ये कोणताही फेरफार झाला नसल्याचा निर्वाळा या कमिटी सदस्यांनी दिला आहे. तर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी ही तपासणी योग्य पध्दतीने झाली नसल्याचे आरोप केला आहे. मुधोजी विद्यालयात ही इव्हीएस मशीन ठेवण्यात आली होती. 11 तारखेला इव्हीएम मशिन्सच्या कुलुपाला लावलेल्या स्लिप्स शाळेच्या मैदानात सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. आणि विशेष या स्लीपवर उमेदवारांची सही होती. काँग्रेसच्या स्थानिक उमेदवारांनी याबाबत आक्षेप घेतला आहे इव्हीएम मशीनसोबत छेडछाड केल्याचा संशयही व्यक्त केला तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2012 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close