S M L

मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त

15 फेब्रुवारीमुंबईसह राज्यातल्या दहा महापालिकांसाठीचा प्रचार काल थंडावला. आता उद्या महापालिका निवडणुकांसाठीचे मतदान होतं आहे. काल शेवटच्या दिवशी सर्वच दिग्गज नेत्यांच्या सभा आणि रोड शो ने जाहीर प्रचार सभांची सांगता झाली. मुंबईमध्ये 227 जागांसाठी मतदान होतं आहे. यातील 207 संवेदनशील केंद्र आहेत, तर 4 अतिसंवेदनशील केंद्र आहेत. या पालिका निवडणुकीसाठी एकूण 1 कोटी, 2 लाख, 79 हजार, 377 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये 2 लाख 97 हजार युवा मतदार आहेत. तर 57 लाख, 17 हजार, 972 पुरूष मतदार आहेत. आणि 45 लाख, 61 हजार, 605 महिला मतदार आहेत. एकूण 2232 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्येही 1252 पुरूष उमेदवार आहेत तर 980 महिला उमेदवार आहेत. मतदान करण्यासाठी एकूण 8326 मतदान केंद्र आहेत. तर एकूण 41 हजार निवडणूक अधिकारी या निवडणुकीसाठी काम करणार आहेत. मुंबई- पोलिसांची तयारी - मुंबईमध्ये मतदानासाठी तब्बल 26 हजार पोलीस जवान तैनात- 2375 अधिकारी तर 20,982 पोलीस कॉन्स्टेबल - 2 हजार होमगार्ड, शिघ्रकृतीदल, एसआरपीएफ (SRPF) चा समावेश- दोन उपायुक्त दर्जाचे अधिकारी पोलीस कंट्रोलरुममध्ये असणार - निवडणुकीदरम्यान 73 गुन्हे तर 148 अदखलपात्र गुन्हे दाखल- आतापर्यंत पोलिसांनी 1773 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली - यामध्ये 83 जणांना तडीपारीची कारवाई- 300 शस्त्र परवानाधारकांनी आपले शस्त्र जमा केलेत

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2012 12:27 PM IST

मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त

15 फेब्रुवारी

मुंबईसह राज्यातल्या दहा महापालिकांसाठीचा प्रचार काल थंडावला. आता उद्या महापालिका निवडणुकांसाठीचे मतदान होतं आहे. काल शेवटच्या दिवशी सर्वच दिग्गज नेत्यांच्या सभा आणि रोड शो ने जाहीर प्रचार सभांची सांगता झाली. मुंबईमध्ये 227 जागांसाठी मतदान होतं आहे. यातील 207 संवेदनशील केंद्र आहेत, तर 4 अतिसंवेदनशील केंद्र आहेत. या पालिका निवडणुकीसाठी एकूण 1 कोटी, 2 लाख, 79 हजार, 377 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये 2 लाख 97 हजार युवा मतदार आहेत. तर 57 लाख, 17 हजार, 972 पुरूष मतदार आहेत. आणि 45 लाख, 61 हजार, 605 महिला मतदार आहेत. एकूण 2232 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्येही 1252 पुरूष उमेदवार आहेत तर 980 महिला उमेदवार आहेत. मतदान करण्यासाठी एकूण 8326 मतदान केंद्र आहेत. तर एकूण 41 हजार निवडणूक अधिकारी या निवडणुकीसाठी काम करणार आहेत.

मुंबई- पोलिसांची तयारी

- मुंबईमध्ये मतदानासाठी तब्बल 26 हजार पोलीस जवान तैनात- 2375 अधिकारी तर 20,982 पोलीस कॉन्स्टेबल - 2 हजार होमगार्ड, शिघ्रकृतीदल, एसआरपीएफ (SRPF) चा समावेश- दोन उपायुक्त दर्जाचे अधिकारी पोलीस कंट्रोलरुममध्ये असणार - निवडणुकीदरम्यान 73 गुन्हे तर 148 अदखलपात्र गुन्हे दाखल- आतापर्यंत पोलिसांनी 1773 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली - यामध्ये 83 जणांना तडीपारीची कारवाई- 300 शस्त्र परवानाधारकांनी आपले शस्त्र जमा केलेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2012 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close