S M L

शिवसैनिक मला जीवे मारणार होते - भुजबळ

15 फेब्रुवारीमी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो त्यानंतर संतापलेल्या 200 ते 300 शिवसैनिकांनी माझ्या बंगल्यावर हल्ला केला. बंदुका, तलवारी,सळया, लाठ्या काठ्या घेऊन बंगल्यात घसून माझ्यावर हल्ला केला होता. मी जिंवत वाचेल की नाही यांची सुध्दा मला शक्यता नव्हती पण नशीब बलवंत होतं म्हणून मी कसाबसा त्या हल्ल्यातून वाचलो. असा गौप्यस्फोट एकेकाळचे शिवसेनेचे कट्टर शिलेदार असणारे आणि आजचे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी केला. तसेच राज ठाकरे यांना आजही माझे आव्हान आहे त्यांनी समिर भुजबळ विरोधात लढून दाखवावे असे ठणकावून सांगितले. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत भुजबळांनी हा गौप्यस्फोट केला.अख्या महाराष्ट्राचे राजकारण ज्या पक्षा भोवती फिरले तो शिवसेना पक्ष. आज महापालिकाच्या निवडणुकीत आपली सत्ता कायम राखण्यासाठी सर्वशक्तीपणाला लावून लढाईत उतरला आहे. पण याचबरोबर शिवसेनेला सोडलेल्या शिवसैनिकांनी आत का घडले यांचा गौप्यस्फोट आयबीएन लोकमतच्या मंचावर केले आहे. या अगोदर खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनंतर राज ठाकरे यांनी आपल्या मनातलं बोलून दाखवलं. आणि आज सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सेनेची 'शिदोरी' खोलली. शिवसेनेला पहिला बंडखोरीचा धक्का लागला. पण यापेक्षा मोठा धक्का छगन भुजबळ यांचा होता. भुजबळ म्हणतात, एका पक्षात 25 वर्ष आहोरात्र झटलो. सेनेसाठी खूप काही केलं. तसेच सेनेनं पण माझ्यासाठी खूप काही केलं आहे. मी दुसर्‍यांदा महापौर झालो होतो. त्यावेळी केंद्राने मंडळ आयोग दिला त्याचे मी स्वागत केले. याचा राग बाळासाहेबांना आला. त्यांनंतर मी महापौरपदावरुन उतरणार होतो त्यावेळा पत्रकार प्रकाश आकोलकर मला भेटले. त्यांनी मला विचारले होते की, तुम्ही यानंतर विरोधी पक्ष नेतेपद स्विकारणार आहात का ? पण मी म्हणालो बाळासाहेबांनी दिले तर स्विकारेल. आणि दुसर्‍या दिवशी वृतपत्रात मला विरोधीपक्ष नेतेपद हवे आहे अशी बातमी आली. यावर बाळासाहेब संतापले आणि त्यांनी सामना मधून, व्यंगचित्र, अग्रलेखातून मला गद्दार म्हणून टीका केली. मीही त्यांना याबद्दल समजावून सांगितले बातमीत काय आहे ते पाहावे पण त्यांच्या लक्षात येईपर्यंत सर्व बाण सुटून गेले होते. मनोहर जोशी हे विरोधी नेते म्हणून 35-40 आमदारांना नको होते. त्यांनी एक पत्र लिहिले. पण एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत बाळासाहेबांनी अशांना झुरळासारखे चिरडून टाकू असे म्हणाले. मग पक्षात फूट पडली. याचे मी नेतृत्व केले हे खरं होतं हे भुजबळांनी यावेळी मान्य केलं. तसेच यानंतर मी भूमिगत झालो. एका कंपनीच्या रेस्ट हाऊसवर लपवून राहावे लागत असतं. मग सेना फुटण्यासाठी दोन गट झाले. मग मधुकर चौधरी यांनी स्पष्ट केलं. जर 18 लोक उभे राहिले तरच पक्ष फुटले. त्यातला एक बी गट होता. नंतर तोही फूटला. यातून 10 फुटले आणि त्यानंतर आम्हाला मान्यता मिळाली आणि विधानसभेवर आलो. यावेळी मधुकर चौधरी यांच्यावरही शिवसैनिक धावून गेले होते. यानंतर शिवसैनिकांनी माझ्यावर खूप वेळा हल्ले केले. ते दिवस खूप कठीण होते. त्यावेळी रमाबाईनगर येथे हत्याकांड घडले ते मी स्वत:जाऊन पाहिले. या घटनेनंतर तिसर्‍या दिवशी माझ्यावर हल्ला झाला. मी सरकारी बंगल्यात विरोधी पक्ष नेता म्हणून राहत होतो. त्या बंगल्याच्या परिसरात कोणतीच घर नव्हती. पण अचानक शिवसेनेच्या नेत्यांची घर वाढायला लागली. मी पोलिसांना याबद्दल कळवले पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. आणि अचानक 200 ते 300 शिवसैनिकांनी बंदुका, सळया, तलवारी घेऊन बंगल्यावर हल्लाबोल केला. टेलिफोन लाईन तोडली. बंगला खूप मोठा होता त्याला अनेक दार होती. मी आणि माझा सावंत नावाचा हवालदार एका एका रुममध्ये लपत दार बंद करुन घेत होतो. आणि शिवसैनिक दारं तोडत आत येत होती. त्यावेळी नशिबांने माझ्याकडे मोबाईल होता फोन करुन बाहेर कळवले. आता आपण वाचणार की नाही यांची शक्यताच नव्हती. अखेरीस बेडरुममध्ये आलो. हवालदाराला म्हटलं तुला वाचायचे असेल तर पळ काढं पण त्यांनी मला सोडले नाही. बेडरुमच्या दारावर शिवसैनिक येऊन धडकले. तोच हवालदार फायरिंग म्हणून जोरात ओरडला. आणि काय चमत्कार घडला. त्यांनी फायरिंग..फायरिंग होत आहे असा समज करुन बंगल्याबाहेर पळत सुटले. सुदैवाने त्या दिवशी वाचलो असा थरारक अनुभव भुजबळांनी सांगितला. पण त्याच बरोबर सेनेसाठी प्रत्येक आंदोलनात मी पुढे होते त्यावेळी पोलिसांचा, गुंडाचा मार खाल्ला होता हे त्यांनी सांगितले. आता ती शिवसेना राहीली नाही. म्हणून त्यांना गळती लागली आहे. निवडणूकानंतर कदाचित सेना सुर्यास्ताकडे जाईल. पण सेनेतून बाहेर पडलेले अनेकजण आज खासदार,आमदार झाले. त्यात नारायण राणे सुध्दा आहे. या पालिकेत नाशकात आघाडीची सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2012 03:08 PM IST

शिवसैनिक मला जीवे मारणार होते - भुजबळ

15 फेब्रुवारी

मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो त्यानंतर संतापलेल्या 200 ते 300 शिवसैनिकांनी माझ्या बंगल्यावर हल्ला केला. बंदुका, तलवारी,सळया, लाठ्या काठ्या घेऊन बंगल्यात घसून माझ्यावर हल्ला केला होता. मी जिंवत वाचेल की नाही यांची सुध्दा मला शक्यता नव्हती पण नशीब बलवंत होतं म्हणून मी कसाबसा त्या हल्ल्यातून वाचलो. असा गौप्यस्फोट एकेकाळचे शिवसेनेचे कट्टर शिलेदार असणारे आणि आजचे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी केला. तसेच राज ठाकरे यांना आजही माझे आव्हान आहे त्यांनी समिर भुजबळ विरोधात लढून दाखवावे असे ठणकावून सांगितले. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत भुजबळांनी हा गौप्यस्फोट केला.

अख्या महाराष्ट्राचे राजकारण ज्या पक्षा भोवती फिरले तो शिवसेना पक्ष. आज महापालिकाच्या निवडणुकीत आपली सत्ता कायम राखण्यासाठी सर्वशक्तीपणाला लावून लढाईत उतरला आहे. पण याचबरोबर शिवसेनेला सोडलेल्या शिवसैनिकांनी आत का घडले यांचा गौप्यस्फोट आयबीएन लोकमतच्या मंचावर केले आहे. या अगोदर खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनंतर राज ठाकरे यांनी आपल्या मनातलं बोलून दाखवलं. आणि आज सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सेनेची 'शिदोरी' खोलली. शिवसेनेला पहिला बंडखोरीचा धक्का लागला. पण यापेक्षा मोठा धक्का छगन भुजबळ यांचा होता. भुजबळ म्हणतात, एका पक्षात 25 वर्ष आहोरात्र झटलो. सेनेसाठी खूप काही केलं. तसेच सेनेनं पण माझ्यासाठी खूप काही केलं आहे. मी दुसर्‍यांदा महापौर झालो होतो. त्यावेळी केंद्राने मंडळ आयोग दिला त्याचे मी स्वागत केले. याचा राग बाळासाहेबांना आला. त्यांनंतर मी महापौरपदावरुन उतरणार होतो त्यावेळा पत्रकार प्रकाश आकोलकर मला भेटले. त्यांनी मला विचारले होते की, तुम्ही यानंतर विरोधी पक्ष नेतेपद स्विकारणार आहात का ? पण मी म्हणालो बाळासाहेबांनी दिले तर स्विकारेल. आणि दुसर्‍या दिवशी वृतपत्रात मला विरोधीपक्ष नेतेपद हवे आहे अशी बातमी आली. यावर बाळासाहेब संतापले आणि त्यांनी सामना मधून, व्यंगचित्र, अग्रलेखातून मला गद्दार म्हणून टीका केली. मीही त्यांना याबद्दल समजावून सांगितले बातमीत काय आहे ते पाहावे पण त्यांच्या लक्षात येईपर्यंत सर्व बाण सुटून गेले होते.

मनोहर जोशी हे विरोधी नेते म्हणून 35-40 आमदारांना नको होते. त्यांनी एक पत्र लिहिले. पण एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत बाळासाहेबांनी अशांना झुरळासारखे चिरडून टाकू असे म्हणाले. मग पक्षात फूट पडली. याचे मी नेतृत्व केले हे खरं होतं हे भुजबळांनी यावेळी मान्य केलं. तसेच यानंतर मी भूमिगत झालो. एका कंपनीच्या रेस्ट हाऊसवर लपवून राहावे लागत असतं. मग सेना फुटण्यासाठी दोन गट झाले. मग मधुकर चौधरी यांनी स्पष्ट केलं. जर 18 लोक उभे राहिले तरच पक्ष फुटले. त्यातला एक बी गट होता. नंतर तोही फूटला. यातून 10 फुटले आणि त्यानंतर आम्हाला मान्यता मिळाली आणि विधानसभेवर आलो. यावेळी मधुकर चौधरी यांच्यावरही शिवसैनिक धावून गेले होते. यानंतर शिवसैनिकांनी माझ्यावर खूप वेळा हल्ले केले. ते दिवस खूप कठीण होते. त्यावेळी रमाबाईनगर येथे हत्याकांड घडले ते मी स्वत:जाऊन पाहिले. या घटनेनंतर तिसर्‍या दिवशी माझ्यावर हल्ला झाला. मी सरकारी बंगल्यात विरोधी पक्ष नेता म्हणून राहत होतो. त्या बंगल्याच्या परिसरात कोणतीच घर नव्हती.

पण अचानक शिवसेनेच्या नेत्यांची घर वाढायला लागली. मी पोलिसांना याबद्दल कळवले पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. आणि अचानक 200 ते 300 शिवसैनिकांनी बंदुका, सळया, तलवारी घेऊन बंगल्यावर हल्लाबोल केला. टेलिफोन लाईन तोडली. बंगला खूप मोठा होता त्याला अनेक दार होती. मी आणि माझा सावंत नावाचा हवालदार एका एका रुममध्ये लपत दार बंद करुन घेत होतो. आणि शिवसैनिक दारं तोडत आत येत होती. त्यावेळी नशिबांने माझ्याकडे मोबाईल होता फोन करुन बाहेर कळवले. आता आपण वाचणार की नाही यांची शक्यताच नव्हती. अखेरीस बेडरुममध्ये आलो. हवालदाराला म्हटलं तुला वाचायचे असेल तर पळ काढं पण त्यांनी मला सोडले नाही. बेडरुमच्या दारावर शिवसैनिक येऊन धडकले. तोच हवालदार फायरिंग म्हणून जोरात ओरडला. आणि काय चमत्कार घडला. त्यांनी फायरिंग..फायरिंग होत आहे असा समज करुन बंगल्याबाहेर पळत सुटले. सुदैवाने त्या दिवशी वाचलो असा थरारक अनुभव भुजबळांनी सांगितला.

पण त्याच बरोबर सेनेसाठी प्रत्येक आंदोलनात मी पुढे होते त्यावेळी पोलिसांचा, गुंडाचा मार खाल्ला होता हे त्यांनी सांगितले. आता ती शिवसेना राहीली नाही. म्हणून त्यांना गळती लागली आहे. निवडणूकानंतर कदाचित सेना सुर्यास्ताकडे जाईल. पण सेनेतून बाहेर पडलेले अनेकजण आज खासदार,आमदार झाले. त्यात नारायण राणे सुध्दा आहे. या पालिकेत नाशकात आघाडीची सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2012 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close