S M L

मतदान संपले,आता फैसला जनतेचा

16 फेब्रुवारीराज्यातल्या दहा महापालिकांसाठी मतदान आज मतदारांच्या निरुत्साहात संपले. राज्यभरात सरासरी 54 टक्के मतदान झाले आहे. राज्याच्या आर्थिक राजधानी मुंबईत 46 टक्केच मतदान होऊ शकले आहे. तर पुण्यात 57 टक्के मतदान झाले आहे. यापाठोपाठ पिंपरी चिंचवड 56 ठाणे 52, नाशिक 58, अमरावती 58, अकोला 57, उल्हासनगर 43, नागपूर - 55, सोलापूरमध्ये 58 टक्के सरासरी मतदान झाले आहेत. 50 टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर हे पहिलंच मतदान होतं. त्यामुळे महिला मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडल्या. आता सगळ्यांचं लक्ष उद्याच्या मतमोजणीकडे लागलं आहे. आपल्याला बदल घडवला पाहिजे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असं आवाहन सगळेजण करत होते. पण मुंबई आणि पुण्यात मात्र मतदार निरुत्साही दिसले. इतर आठ महापालिकांमध्ये तुलनेनं चांगलं मतदान झालं. महानगरपालिकांचे निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे - मुंबई राज ठाकरे, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण - पुणेअजित पवार, पृथ्वीराज चव्हाण- पिंपरी चिंचवड अजित पवार, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम- नाशिक राज ठाकरे, छगन भुजबळ- ठाणे जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे- नागपूरनितीन गडकरी, विलास मुत्तेमवार- सोलापूरसुशीलकुमार शिंदे, लक्ष्मण ढोबळे

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2012 05:31 PM IST

मतदान संपले,आता फैसला जनतेचा

16 फेब्रुवारी

राज्यातल्या दहा महापालिकांसाठी मतदान आज मतदारांच्या निरुत्साहात संपले. राज्यभरात सरासरी 54 टक्के मतदान झाले आहे. राज्याच्या आर्थिक राजधानी मुंबईत 46 टक्केच मतदान होऊ शकले आहे. तर पुण्यात 57 टक्के मतदान झाले आहे. यापाठोपाठ पिंपरी चिंचवड 56 ठाणे 52, नाशिक 58, अमरावती 58, अकोला 57, उल्हासनगर 43, नागपूर - 55, सोलापूरमध्ये 58 टक्के सरासरी मतदान झाले आहेत. 50 टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर हे पहिलंच मतदान होतं. त्यामुळे महिला मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडल्या. आता सगळ्यांचं लक्ष उद्याच्या मतमोजणीकडे लागलं आहे. आपल्याला बदल घडवला पाहिजे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असं आवाहन सगळेजण करत होते. पण मुंबई आणि पुण्यात मात्र मतदार निरुत्साही दिसले. इतर आठ महापालिकांमध्ये तुलनेनं चांगलं मतदान झालं.

महानगरपालिकांचे निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

- मुंबई राज ठाकरे, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण - पुणेअजित पवार, पृथ्वीराज चव्हाण

- पिंपरी चिंचवड अजित पवार, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम- नाशिक राज ठाकरे, छगन भुजबळ

- ठाणे जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे

- नागपूरनितीन गडकरी, विलास मुत्तेमवार

- सोलापूरसुशीलकुमार शिंदे, लक्ष्मण ढोबळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2012 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close