S M L

मी सत्तेसाठी हावरट नाही - राज

18 फेब्रुवारीराज्यभरात झालेल्या 10 पालिका निवडणुकीच मनसेचे उमेदवार निवडुन येण्याचं प्रमाण दुपट्टीनं वाढलं आहे. पुण्याच निकाल पाहुन मी भारावून गेलो आहे. पुणेकरांचा मी आभारी आहे उद्या नाशिकाला जाऊन तिथली परिस्थिती पाहुन निर्णय घेऊ असं राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीकडे सत्ता असुन सुध्दा विकास करत नाही असा टोलाही राज यांनी लगावला. मी सत्तेसाठी हावरट नाही असंही राज यांनी स्पष्ट केलं. मनसेच्या विजयी उमेदवारांना भेटण्यासाठी राज पुण्यात आले होते यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचित केली. विद्येचं माहेरघर पुण्यात मनसेचं इंजिन सुसाट पळालं. पुण्यात 29 जागा तर पिंपरी चिंचवडमध्ये 4 जागा मिळवल्या आहेत. विजयी उमेदवारांना भेटण्यासाठी खुद्द अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले. उमेदवारांचे अभिनंदन करत तमाम पुणेकरांचे राज यांनी आभार मानले. मनसेचा निकाल पाहुन मी भारावून गेलो आहे. आपले उमेदवार आपल्या मेहनतीने निवडून आले त्यांचं खरंच कौतुक आहे. आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडे जाऊ देणार नाही. उमेदवार आपलं काम चोख बजावतील असा विश्वासही राज यांनी दाखवला. तसेच आपल्याला फोडाफोडीचे राजकारण करता येत नाही आणि ते काही काळासाठी असते त्यापेक्षा पक्षातील माणसांनाच मोठं करणे चांगले आहे. मला सत्तेची हाव नाही, सत्तेसाठी हावरट नाही असंही राज यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस ही पक्ष बाहेर भांडतात आणि वेळ आली तर सत्तेसाठी एकत्र येतात ही जनता कसे खपवून घेते असा सवाल राज यांनी उपस्थित केला. तिकडे राष्ट्रवादीकडे राज्यात सत्ता आहे पण तरी विकास करत नाही असा टोलाही राज यांनी लगावला. मनसेनं नाशिकमध्ये सर्वाधिक 40 जागा मिळवल्या आहेत. आता उद्या राज नाशकात जाऊन विजयी उमेदवारांची भेट घेणार आहे. आपल्याच पक्षाचा महापौर असणार असा दावा करण्यात आला आहे. आता राज उद्या काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2012 01:21 PM IST

मी सत्तेसाठी हावरट नाही - राज

18 फेब्रुवारी

राज्यभरात झालेल्या 10 पालिका निवडणुकीच मनसेचे उमेदवार निवडुन येण्याचं प्रमाण दुपट्टीनं वाढलं आहे. पुण्याच निकाल पाहुन मी भारावून गेलो आहे. पुणेकरांचा मी आभारी आहे उद्या नाशिकाला जाऊन तिथली परिस्थिती पाहुन निर्णय घेऊ असं राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीकडे सत्ता असुन सुध्दा विकास करत नाही असा टोलाही राज यांनी लगावला. मी सत्तेसाठी हावरट नाही असंही राज यांनी स्पष्ट केलं. मनसेच्या विजयी उमेदवारांना भेटण्यासाठी राज पुण्यात आले होते यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचित केली.

विद्येचं माहेरघर पुण्यात मनसेचं इंजिन सुसाट पळालं. पुण्यात 29 जागा तर पिंपरी चिंचवडमध्ये 4 जागा मिळवल्या आहेत. विजयी उमेदवारांना भेटण्यासाठी खुद्द अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले. उमेदवारांचे अभिनंदन करत तमाम पुणेकरांचे राज यांनी आभार मानले. मनसेचा निकाल पाहुन मी भारावून गेलो आहे. आपले उमेदवार आपल्या मेहनतीने निवडून आले त्यांचं खरंच कौतुक आहे. आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडे जाऊ देणार नाही. उमेदवार आपलं काम चोख बजावतील असा विश्वासही राज यांनी दाखवला. तसेच आपल्याला फोडाफोडीचे राजकारण करता येत नाही आणि ते काही काळासाठी असते त्यापेक्षा पक्षातील माणसांनाच मोठं करणे चांगले आहे. मला सत्तेची हाव नाही, सत्तेसाठी हावरट नाही असंही राज यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस ही पक्ष बाहेर भांडतात आणि वेळ आली तर सत्तेसाठी एकत्र येतात ही जनता कसे खपवून घेते असा सवाल राज यांनी उपस्थित केला. तिकडे राष्ट्रवादीकडे राज्यात सत्ता आहे पण तरी विकास करत नाही असा टोलाही राज यांनी लगावला. मनसेनं नाशिकमध्ये सर्वाधिक 40 जागा मिळवल्या आहेत. आता उद्या राज नाशकात जाऊन विजयी उमेदवारांची भेट घेणार आहे. आपल्याच पक्षाचा महापौर असणार असा दावा करण्यात आला आहे. आता राज उद्या काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2012 01:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close