S M L

निकालानंतर 'गुंडाराज'कारण

20 फेब्रुवारीमहापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर.. राज्यातल्या या चारही महत्त्वाच्या शहरांमध्ये राजकीय गुंडांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. निवडणुकीत एकमेकांवर हल्लाबोल करणारी नेते मंडळी..वाट्याला आलेल्या पराभवातून हल्ले करत आहेत. मुंबई आणि नागपूरमध्ये तर यातून दोन जणांचा खून झाला आहे. तर पुणे आणि नाशिकमध्ये राडेबाजी झाली आहे. नाशकात 48 तासात हल्ले,तोडफोडीच्या 13 घटनानाशिकमध्ये निवडणूक झाल्यापासून 48 तासात हाणामारी, हल्ला आणि तोडफोडीच्या 13 घटना घडल्या आहे. विशेष म्हणजे यात सर्वच पक्षांची आघाडी आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी 10 राजकीय कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांना अटकही केलीए. पण मुद्दा आहे तो पक्ष त्यांच्याविरोधात काय कारवाई करणार याचा...नाशिकच्या सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर...शिवसेनेचे पराभूत उमेदवार निवृत्ती दातीर यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. निवृत्ती दातीर यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये अपक्ष उमेदवार नागेश सोनवणेवर उपचार सुरू आहेत. मनसेच्या पराभूत उमेदवार उषा मोरे यांचे पती मोहन मोरे यांनी मारहाण केल्याची त्यांची तक्रार आहे. निवडणूक झाल्यापासून हाणामार्‍या आणि तोडफोडीचे 13 गुन्हे दाखल झाले आहेत.निवडणुकीनंतर राडेबाजी- कथडा परिसरात दगडफेक आणि हाणामारी- काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष हनिफ शेख यांना अटक- पंचवटीत खांदवे यांच्या घरावर हल्ला- शिवसेनेचे पराभूत उमेदवार महेंद्र बिडवे यांना अटक- प्रतिस्पर्ध्याचा प्रचार केला म्हणून धमकी- काँग्रेस नगरसेवकाचा मुलगा जॉय उत्तम कांबळेला अटक- पाथर्डीमध्ये अपक्ष उमेदवार सुनील कोथमिरेंना मारहाण- राष्ट्रवादीच्या भगवान दोंदेंविरोधात तक्रार... निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतरही नाशिक पोलिसांनी त्यांची कामगिरी बजावली. आता मुद्दा आहे तो ज्या राजकीय कार्यकर्त्यांविरोधात आणि पदाधिकार्‍यांविरोधात हे गुन्हे दाखल झालेत, त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात पक्ष काही भूमिका घेणार की पुन्हा त्यांना पाठीशी घालणार याची.. आणि खरं तर नाशिकची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राजकीय पक्षांची हीच कसोटी आहे, दुसर्‍या पक्षातल्या गुन्हेगारीकडे बोटं दाखवणं सोपं, आपल्या पक्षातल्या हिंसेचा आणि गुंडगिरीचा बंदोबस्त प्रत्येकजण कसा करणार हे महत्त्वाचं..पुण्यात घरात घुसून नागरिकांना मारहाण सुतारवाडी गावठाण भागात निवडणुकीच्या वादातून मोठ्या प्रमाणात वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. हातात तलवार, चाकू आणि कोयते घेऊन 40 - 50 गुंडानी सुतारवाडीत लोकांच्या घरात घुसून नागरिकांना मारहाण केली आहे. अस्ताव्यस्त पसरलेली घरं...आणि बाहेर तोडफोड झालेली वाहनं हे दृश्य होती पुण्यातल्या सुतारवाडीतली...पक्षानं तिकीट न दिल्याने संतप्त झालेल्या आबा सुतार यांनी आपले समर्थक सुनील लांगे यांना बंडखोर म्हणून उभं केलं. पण त्यांचा पराभव झाल्यानंच सुतार यांच्या समर्थकांनी सुतारवाडीत धुमाकूळ घालून मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी केला. दहशत पसरवण्याच्या याप्रकारावर तातडीनं नियंत्रण मिळवण्याची मागणी आता होऊ लागली आहे. 40 ते 50 गुंड धुमाकूळ घालत असताना पोलीस काय करत होते असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे.पुण्यात निवडणुकीनंतर काय काय प्रकार घडलेत ?1. धनकवडी- अजित बाबर समर्थकांचा क्षेत्रीय कार्यालयावर हल्ला 250 जणांवर गुन्हा दाखल. मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांच्या विजयाला आक्षेप घेत त्यांनी तोडफोड केली होती. 2. हडपसर- मनसे उमेदवार सविता मोरे यांच्यासह कुटुंबीयांना मारहाणकाँग्रेसच्या पराभूत उमेदवार ललिता तुपेंवर आरोप, 7 जणांना अटक 3. पिंपरी- मनसेच्या पराभूत महिला उमेदवार लक्ष्मी जगताप यांच्या घरावर हल्ला काँग्रेसचे नगरसेवक कैलास कदम आणि सदगुरू कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल4. वाल्हेकरवाडी - शिवसेना शहराध्यक्ष भगवान वाल्हेकर यांच्या मुलांची नागरिकांना मारहाण 6 जणांविरोधात तक्रार दाखल5. सांगवी- माजी नगरसेवक हनुमंत खोमणे यांच्या घरावर हल्लाकाँग्रेसचे पराभूत उमेदवार सचिन साठेंंविरोधात तक्रारपिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारांना मारहाणपिंपरी चिंचवडमध्येही निवडणुकीनंतर मारहाणीच्या घटना सुरु आहेत. विजयी उमेदवारांकडून पराभूत उमेदवारांना धमक्या दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काँग्रेसचे नगरसेवक कैलास कदम आणि त्यांचे बंधू नगरसेवक सदगुरु कदम या तिघांसह 8 ते 10 कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहे. पराभूत उमेदवारांच्या घरी जावून दमदाटी, मारहाण, जिवे मारण्याची धमकी अशा प्रकारचे गुन्हे पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे. मात्र आपण घटनास्थळी नव्हतोच असा दावा या नगरसेवकांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2012 09:15 AM IST

निकालानंतर 'गुंडाराज'कारण

20 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर.. राज्यातल्या या चारही महत्त्वाच्या शहरांमध्ये राजकीय गुंडांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. निवडणुकीत एकमेकांवर हल्लाबोल करणारी नेते मंडळी..वाट्याला आलेल्या पराभवातून हल्ले करत आहेत. मुंबई आणि नागपूरमध्ये तर यातून दोन जणांचा खून झाला आहे. तर पुणे आणि नाशिकमध्ये राडेबाजी झाली आहे.

नाशकात 48 तासात हल्ले,तोडफोडीच्या 13 घटनानाशिकमध्ये निवडणूक झाल्यापासून 48 तासात हाणामारी, हल्ला आणि तोडफोडीच्या 13 घटना घडल्या आहे. विशेष म्हणजे यात सर्वच पक्षांची आघाडी आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी 10 राजकीय कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांना अटकही केलीए. पण मुद्दा आहे तो पक्ष त्यांच्याविरोधात काय कारवाई करणार याचा...नाशिकच्या सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर...शिवसेनेचे पराभूत उमेदवार निवृत्ती दातीर यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. निवृत्ती दातीर यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये अपक्ष उमेदवार नागेश सोनवणेवर उपचार सुरू आहेत. मनसेच्या पराभूत उमेदवार उषा मोरे यांचे पती मोहन मोरे यांनी मारहाण केल्याची त्यांची तक्रार आहे. निवडणूक झाल्यापासून हाणामार्‍या आणि तोडफोडीचे 13 गुन्हे दाखल झाले आहेत.

निवडणुकीनंतर राडेबाजी- कथडा परिसरात दगडफेक आणि हाणामारी- काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष हनिफ शेख यांना अटक- पंचवटीत खांदवे यांच्या घरावर हल्ला- शिवसेनेचे पराभूत उमेदवार महेंद्र बिडवे यांना अटक- प्रतिस्पर्ध्याचा प्रचार केला म्हणून धमकी- काँग्रेस नगरसेवकाचा मुलगा जॉय उत्तम कांबळेला अटक- पाथर्डीमध्ये अपक्ष उमेदवार सुनील कोथमिरेंना मारहाण- राष्ट्रवादीच्या भगवान दोंदेंविरोधात तक्रार

... निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतरही नाशिक पोलिसांनी त्यांची कामगिरी बजावली. आता मुद्दा आहे तो ज्या राजकीय कार्यकर्त्यांविरोधात आणि पदाधिकार्‍यांविरोधात हे गुन्हे दाखल झालेत, त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात पक्ष काही भूमिका घेणार की पुन्हा त्यांना पाठीशी घालणार याची.. आणि खरं तर नाशिकची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राजकीय पक्षांची हीच कसोटी आहे, दुसर्‍या पक्षातल्या गुन्हेगारीकडे बोटं दाखवणं सोपं, आपल्या पक्षातल्या हिंसेचा आणि गुंडगिरीचा बंदोबस्त प्रत्येकजण कसा करणार हे महत्त्वाचं..

पुण्यात घरात घुसून नागरिकांना मारहाण सुतारवाडी गावठाण भागात निवडणुकीच्या वादातून मोठ्या प्रमाणात वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. हातात तलवार, चाकू आणि कोयते घेऊन 40 - 50 गुंडानी सुतारवाडीत लोकांच्या घरात घुसून नागरिकांना मारहाण केली आहे. अस्ताव्यस्त पसरलेली घरं...आणि बाहेर तोडफोड झालेली वाहनं हे दृश्य होती पुण्यातल्या सुतारवाडीतली...पक्षानं तिकीट न दिल्याने संतप्त झालेल्या आबा सुतार यांनी आपले समर्थक सुनील लांगे यांना बंडखोर म्हणून उभं केलं. पण त्यांचा पराभव झाल्यानंच सुतार यांच्या समर्थकांनी सुतारवाडीत धुमाकूळ घालून मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी केला. दहशत पसरवण्याच्या याप्रकारावर तातडीनं नियंत्रण मिळवण्याची मागणी आता होऊ लागली आहे. 40 ते 50 गुंड धुमाकूळ घालत असताना पोलीस काय करत होते असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे.

पुण्यात निवडणुकीनंतर काय काय प्रकार घडलेत ?

1. धनकवडी- अजित बाबर समर्थकांचा क्षेत्रीय कार्यालयावर हल्ला 250 जणांवर गुन्हा दाखल. मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांच्या विजयाला आक्षेप घेत त्यांनी तोडफोड केली होती. 2. हडपसर- मनसे उमेदवार सविता मोरे यांच्यासह कुटुंबीयांना मारहाणकाँग्रेसच्या पराभूत उमेदवार ललिता तुपेंवर आरोप, 7 जणांना अटक 3. पिंपरी- मनसेच्या पराभूत महिला उमेदवार लक्ष्मी जगताप यांच्या घरावर हल्ला काँग्रेसचे नगरसेवक कैलास कदम आणि सदगुरू कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल4. वाल्हेकरवाडी - शिवसेना शहराध्यक्ष भगवान वाल्हेकर यांच्या मुलांची नागरिकांना मारहाण 6 जणांविरोधात तक्रार दाखल5. सांगवी- माजी नगरसेवक हनुमंत खोमणे यांच्या घरावर हल्लाकाँग्रेसचे पराभूत उमेदवार सचिन साठेंंविरोधात तक्रारपिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारांना मारहाण

पिंपरी चिंचवडमध्येही निवडणुकीनंतर मारहाणीच्या घटना सुरु आहेत. विजयी उमेदवारांकडून पराभूत उमेदवारांना धमक्या दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काँग्रेसचे नगरसेवक कैलास कदम आणि त्यांचे बंधू नगरसेवक सदगुरु कदम या तिघांसह 8 ते 10 कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहे. पराभूत उमेदवारांच्या घरी जावून दमदाटी, मारहाण, जिवे मारण्याची धमकी अशा प्रकारचे गुन्हे पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे. मात्र आपण घटनास्थळी नव्हतोच असा दावा या नगरसेवकांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2012 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close