S M L

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा धक्कादायक निर्णयांनी गाजली

21 नोव्हेंबर मुंबई 44व्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा नुकत्याच मुंबईच्या कामगार कल्याण केंद्रात पार पडल्या. यंदाची स्पर्धा धक्कादायक निकालांनी गाजली. जवळ जवळ सगळयाच प्रकारात टॉप सिडेड खेळाडूंना पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या सिंगल्सचं विजेतेपद पटकावलं ते विलास दळवीने. फायनलमध्ये त्याने संजय पालवेचा 23 - 25, 25 - 18 आणि 25 - 5 असा पराभव केला. महिला गटातही अनुपमा केदार या आंतरराष्ट्रीय खेळाडूला पराभव पत्करावा लागला. आणि शिल्पा पळनीटकर या तुलनेने नवख्या खेळाडूने महिलांचं विजेतेपद मिळवलं. दोन्ही खेळाडूंचं हे पहिलंच राज्यस्तरीय विजेतेपद आहे. यावर्षी स्पर्धेला प्रतिसादही भरघोस मिळाला. 17 जिल्ह्यातून 800च्यावर कॅरमपटू यात सहभागी झाले होते. तसंच प्रथमच स्पर्धेत 80 हजार रुपये इतक्या रकमेची बक्षिसं ठेवण्यात आली होती. या स्पर्धेतून आठ खेळाडूंची निवड नॅशनल स्पर्धेसाठी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2008 05:46 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2008 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close