S M L

तानसा पाईपलाईन फुटली ; लाखो लिटर पाणी वाया

20 फेब्रुवारीमुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा पाईपलाईन ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत धामणगावजवळ फुटली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठयावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे जवळच्याच तब्बल 100 एकर शेतात पाणी घुसलं आहे. ही पाईपलाईन ब्रिटीश कालीन असल्यामुळे आज इतक्यावर्षानंतर आतून गंजली आहे. त्यामुळे ती फुटली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या घटनास्थळी कर्मचार्‍यांची टीम दाखल झाली आहे. जलवाहिनी बंद करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2012 03:08 PM IST

तानसा पाईपलाईन फुटली ; लाखो लिटर पाणी वाया

20 फेब्रुवारी

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा पाईपलाईन ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत धामणगावजवळ फुटली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठयावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे जवळच्याच तब्बल 100 एकर शेतात पाणी घुसलं आहे. ही पाईपलाईन ब्रिटीश कालीन असल्यामुळे आज इतक्यावर्षानंतर आतून गंजली आहे. त्यामुळे ती फुटली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या घटनास्थळी कर्मचार्‍यांची टीम दाखल झाली आहे. जलवाहिनी बंद करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2012 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close