S M L

चंद्रपूरमध्ये इलेक्ट्रिक शॉक देऊन वाघिणीची शिकार

20 फेब्रुवारीचंद्रपूरमधल्या लोहारा संशोधन केंद्राजवळ एका वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तब्बल 11 किलो व्होल्टच्या तारेतून इलेक्ट्रिक शॉक देऊन या वाघिणीची शिकार करण्यात आली असल्याचा संशय आहे. या वाघिणीचं याच परिसरात वास्तव्य असल्याचं गावकर्‍यांनी सांगितले आहे. 5 ते 6 वर्ष वय असलेल्या या वाघिणीच्या गूढ मृत्यूमुळे तिचे 2 बछडे मात्र पोरके झाले आहेत. यातला एक बछडा आईच्या अचानक मृत्युमुळे तिथंच थिजून बसलेला सापडला तर दुसरा जंगलात भरकटला. विजेच्या धक्क्याने वाघिणीचा एक पाय पूर्णपणे कापला गेला आहे. लोहारा इथं वनविभागाचे साग लाकडाचे संशोधन केंद्र आहे, ताडोबा अभयारण्याला जोडूनच हा भाग येतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2012 10:14 AM IST

चंद्रपूरमध्ये इलेक्ट्रिक शॉक देऊन वाघिणीची शिकार

20 फेब्रुवारी

चंद्रपूरमधल्या लोहारा संशोधन केंद्राजवळ एका वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तब्बल 11 किलो व्होल्टच्या तारेतून इलेक्ट्रिक शॉक देऊन या वाघिणीची शिकार करण्यात आली असल्याचा संशय आहे. या वाघिणीचं याच परिसरात वास्तव्य असल्याचं गावकर्‍यांनी सांगितले आहे. 5 ते 6 वर्ष वय असलेल्या या वाघिणीच्या गूढ मृत्यूमुळे तिचे 2 बछडे मात्र पोरके झाले आहेत. यातला एक बछडा आईच्या अचानक मृत्युमुळे तिथंच थिजून बसलेला सापडला तर दुसरा जंगलात भरकटला. विजेच्या धक्क्याने वाघिणीचा एक पाय पूर्णपणे कापला गेला आहे. लोहारा इथं वनविभागाचे साग लाकडाचे संशोधन केंद्र आहे, ताडोबा अभयारण्याला जोडूनच हा भाग येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2012 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close