S M L

मर्जीतल्या मुलाशी लग्नाला नकार दिला म्हणून बापाने केला लेकीचा खून

20 फेब्रुवारीआपल्या समाजातील मुलाशी लग्न करण्यास नकार दिल्याने चिडून वडिलांनी आपल्या मुलीचा लोखंडी अँगलनं मारुन खून केल्याची घटना घडली आहे. मुलीचं नाव आशा शिंदे तर आरोपी वडील शंकर शिंदे असं नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आशा शंकर शिंदे हिचे पदवीपर्यंतचे बी एस्सी शिक्षण औंध मध्येच झाले होते. त्यानंतर एम.एस.डब्युपर्यंतचे शिक्षण तिने सातारा जकातवाडी येथे घेतले होते.ते पूर्ण झाल्यानंतर ती मगील वर्षापासून पुणे येथे एका संस्थेत नोकरी होती. तिला तीन बहिणी व एक भाऊ असून,सर्वांची लग्न झालेली आहेत. तिचा विवाह करण्याच्यादृष्टीने घरात हालचाल सुरु होत्या. वडिलांच्या मर्जीप्रमाणे कोणत्याही मुलाशी लग्न करणार नाही. माझ्या पसंतीच्या मुलाशीच मी लग्न करणार असे आशा म्हणत होती. तिचे वडील,भाऊ, बहीण व इतर नातेवाईकांनी समजावून सांगुनही ती ऐकत नव्हती. याचाच तिच्या वडिलांना राग आला व समाजमध्ये व नातेवाइकांमध्येआपली बदनामी होईल,असे वाटल्याने चिडून तिच्या वडिलांनी डोक्यात लोखंडी अँगल मारुन तिचा खून केला. पोटच्या पोरीला जीवे मारल्यानंतर शंकर शिदेनं स्वतःच पोलिसांना बोलवलं. आणि गुन्ह्याची कबुली दिली. 21 व्या शकतातही ऑनर किलिंगच्या घटना होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला काळीमा फासला गेला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2012 12:11 PM IST

मर्जीतल्या मुलाशी लग्नाला नकार दिला म्हणून बापाने केला लेकीचा खून

20 फेब्रुवारी

आपल्या समाजातील मुलाशी लग्न करण्यास नकार दिल्याने चिडून वडिलांनी आपल्या मुलीचा लोखंडी अँगलनं मारुन खून केल्याची घटना घडली आहे. मुलीचं नाव आशा शिंदे तर आरोपी वडील शंकर शिंदे असं नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आशा शंकर शिंदे हिचे पदवीपर्यंतचे बी एस्सी शिक्षण औंध मध्येच झाले होते. त्यानंतर एम.एस.डब्युपर्यंतचे शिक्षण तिने सातारा जकातवाडी येथे घेतले होते.ते पूर्ण झाल्यानंतर ती मगील वर्षापासून पुणे येथे एका संस्थेत नोकरी होती. तिला तीन बहिणी व एक भाऊ असून,सर्वांची लग्न झालेली आहेत. तिचा विवाह करण्याच्यादृष्टीने घरात हालचाल सुरु होत्या. वडिलांच्या मर्जीप्रमाणे कोणत्याही मुलाशी लग्न करणार नाही. माझ्या पसंतीच्या मुलाशीच मी लग्न करणार असे आशा म्हणत होती. तिचे वडील,भाऊ, बहीण व इतर नातेवाईकांनी समजावून सांगुनही ती ऐकत नव्हती. याचाच तिच्या वडिलांना राग आला व समाजमध्ये व नातेवाइकांमध्येआपली बदनामी होईल,असे वाटल्याने चिडून तिच्या वडिलांनी डोक्यात लोखंडी अँगल मारुन तिचा खून केला. पोटच्या पोरीला जीवे मारल्यानंतर शंकर शिदेनं स्वतःच पोलिसांना बोलवलं. आणि गुन्ह्याची कबुली दिली. 21 व्या शकतातही ऑनर किलिंगच्या घटना होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला काळीमा फासला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2012 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close