S M L

महापौरपदासाठी मातोश्रीवर लॉबिंग ; सुनिल प्रभुंचं नाव आघाडीवर

21 फेब्रुवारीमहापालिका निकालानंतर आता वेध लागलेत ते महापौर निवडीचे..मुंबई पालिकेचं महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे मातोश्रीवर आतापासून लॉबिंग सुरु झालं आहे. मतांचा विचार केला तर शिवसेनेचे सुनील प्रभू 9,720 मतांनी विजयी झाले आहेत. तर सुरेंद्र बागलकर 8,423 आणि नाना आंबोले 7,770 मतांनी निवडून आले आहेत. सर्वात जास्त मतांची आघाडी घेतलेले आणि यापूर्वी सभागृह नेते राहिलेले सुनिल प्रभु यांच्या नावाची महापौरपदासाठी जोरदार चर्चा सुरु आहे. तर चंद्रकांत पडवळ यांच्यानंतर दक्षिण मंबईला महापौरपद मिळालेलं नाही.त्यामुळे बागलकर याच्याही नावाचा विचार होऊ शकतो.तर याआधीचं महापौरपद श्रद्धा जाधव यांनी भुषवलं होतं. त्यामुळे आता महिलेऐवजी यावेळेस पुरुष महापौर होण्याची शक्यता जास्त आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2012 09:50 AM IST

महापौरपदासाठी मातोश्रीवर लॉबिंग ; सुनिल प्रभुंचं नाव आघाडीवर

21 फेब्रुवारी

महापालिका निकालानंतर आता वेध लागलेत ते महापौर निवडीचे..मुंबई पालिकेचं महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे मातोश्रीवर आतापासून लॉबिंग सुरु झालं आहे. मतांचा विचार केला तर शिवसेनेचे सुनील प्रभू 9,720 मतांनी विजयी झाले आहेत. तर सुरेंद्र बागलकर 8,423 आणि नाना आंबोले 7,770 मतांनी निवडून आले आहेत. सर्वात जास्त मतांची आघाडी घेतलेले आणि यापूर्वी सभागृह नेते राहिलेले सुनिल प्रभु यांच्या नावाची महापौरपदासाठी जोरदार चर्चा सुरु आहे. तर चंद्रकांत पडवळ यांच्यानंतर दक्षिण मंबईला महापौरपद मिळालेलं नाही.त्यामुळे बागलकर याच्याही नावाचा विचार होऊ शकतो.तर याआधीचं महापौरपद श्रद्धा जाधव यांनी भुषवलं होतं. त्यामुळे आता महिलेऐवजी यावेळेस पुरुष महापौर होण्याची शक्यता जास्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2012 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close