S M L

मराठवाड्यात युतीची गाडी सुसाट !

माधव सावरगावे, औरंगाबाद20 फेब्रुवारीमराठवाड्यातील 8 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना -भाजप युतीने कमाल करून दाखवली आहे. 2007 मध्ये एका जिल्हापरिषदेवर युतीची सत्ता होती. पण काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का देत युतीने हिंगोली आणि जालना जिल्हा परिषदेची सत्ता एकहाती मिळवली आहे. मराठवाड्यातील बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. ते मुंडे घराण्यातील भाऊबंदकीमुळे पंडितअण्णा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या बंडामुळे मुंडेच्या बालेकिल्ल्यात काय होणार हा प्रश्न सगळ्याना पडला होता. पण गोपीनाथ मुंडेंनी पुन्हा एकदा आपली जादूची कांडी फिरवली आणि आपल्या विरोधकांना धूळ चारली.लातूरमध्ये विलासरावांनी एकहाती सत्ता मिळवली तर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना निसटती सत्ता मिळवली. औरंगाबाद जिल्हा परिषदेत मात्र मोठी उलथापालथ झाली. गेल्या 10 वर्षांची शिवसेना-भाजप युतीची सत्ता मतदारांनी उलथून टाकली आहे. आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणात नवख्या असलेल्या मनसेला किंगमेकर बनण्याची संधी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मराठवाड्याच्या राजकारणात सेना-भाजपने कमबॅक केलं आहे. हा काँग्रेस राष्ट्रवादीसाठी इशारा आहे. यातून ते काही बोध घेतात का हेच पाहायचंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2012 02:41 PM IST

मराठवाड्यात युतीची गाडी सुसाट !

माधव सावरगावे, औरंगाबाद

20 फेब्रुवारी

मराठवाड्यातील 8 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना -भाजप युतीने कमाल करून दाखवली आहे. 2007 मध्ये एका जिल्हापरिषदेवर युतीची सत्ता होती. पण काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का देत युतीने हिंगोली आणि जालना जिल्हा परिषदेची सत्ता एकहाती मिळवली आहे.

मराठवाड्यातील बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. ते मुंडे घराण्यातील भाऊबंदकीमुळे पंडितअण्णा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या बंडामुळे मुंडेच्या बालेकिल्ल्यात काय होणार हा प्रश्न सगळ्याना पडला होता. पण गोपीनाथ मुंडेंनी पुन्हा एकदा आपली जादूची कांडी फिरवली आणि आपल्या विरोधकांना धूळ चारली.

लातूरमध्ये विलासरावांनी एकहाती सत्ता मिळवली तर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना निसटती सत्ता मिळवली. औरंगाबाद जिल्हा परिषदेत मात्र मोठी उलथापालथ झाली. गेल्या 10 वर्षांची शिवसेना-भाजप युतीची सत्ता मतदारांनी उलथून टाकली आहे. आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणात नवख्या असलेल्या मनसेला किंगमेकर बनण्याची संधी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मराठवाड्याच्या राजकारणात सेना-भाजपने कमबॅक केलं आहे. हा काँग्रेस राष्ट्रवादीसाठी इशारा आहे. यातून ते काही बोध घेतात का हेच पाहायचंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2012 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close