S M L

टीम इंडियाचे लंकेसमोर पण लोटांगण

21 फेब्रुवारीरविवारी कांगारुंकडून पराभव स्विकारुन विजयाच्या इराद्याने उतरलेल्या टीम इंडियाला ब्रिस्बेन वन डेत श्रीलंकेने भारताचा 51 रन्सने पराभूत केले आहे. या विजयाबरोबरच श्रीलंकेनं पॉईंटटेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावरही झेप घेतली आहे. तर भारतीय टीमची तिसर्‍या क्रमांकावर घसरण झाली आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेने विजयासाठी 290 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण याला उत्तर देताना भारतीय टीम 238 रन्सवर ऑलआऊट झाली. मुळात भारतीय टीमची सुरुवातच खराब झाली. मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये वीरेंद्र सेहवाग शून्यावर आऊट झाला. तर सचिन तेंडुलकर 22 आणि गौतम गंभीर 29 रन्सवर आऊट झाले. विराट कोहली आणि सुरेश रैनाने चौथ्या विकेटसाठी 92 रन्सची पार्टनरशिप करत इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. पण रैना आणि कोहली आऊट झाल्यावर भारताची इनिंग गडगडली. मॅचच्या शेवटच्या ओव्हर्समध्ये इरफान पठाणने आक्रमक बॅटिंग करत रंगत निर्माण केली पण थिसारा परेरानं पठाणची विकेट घेत भारतीय इनिंगला फुलस्टॉप लावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2012 11:42 AM IST

टीम इंडियाचे लंकेसमोर पण लोटांगण

21 फेब्रुवारी

रविवारी कांगारुंकडून पराभव स्विकारुन विजयाच्या इराद्याने उतरलेल्या टीम इंडियाला ब्रिस्बेन वन डेत श्रीलंकेने भारताचा 51 रन्सने पराभूत केले आहे. या विजयाबरोबरच श्रीलंकेनं पॉईंटटेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावरही झेप घेतली आहे. तर भारतीय टीमची तिसर्‍या क्रमांकावर घसरण झाली आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेने विजयासाठी 290 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण याला उत्तर देताना भारतीय टीम 238 रन्सवर ऑलआऊट झाली. मुळात भारतीय टीमची सुरुवातच खराब झाली. मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये वीरेंद्र सेहवाग शून्यावर आऊट झाला. तर सचिन तेंडुलकर 22 आणि गौतम गंभीर 29 रन्सवर आऊट झाले. विराट कोहली आणि सुरेश रैनाने चौथ्या विकेटसाठी 92 रन्सची पार्टनरशिप करत इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. पण रैना आणि कोहली आऊट झाल्यावर भारताची इनिंग गडगडली. मॅचच्या शेवटच्या ओव्हर्समध्ये इरफान पठाणने आक्रमक बॅटिंग करत रंगत निर्माण केली पण थिसारा परेरानं पठाणची विकेट घेत भारतीय इनिंगला फुलस्टॉप लावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2012 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close