S M L

'किंगफिशर' डीजीसीएच्या नजरेखाली

22 फेब्रुवारीअडचणीत सापडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या मॅनेजमेंटने डीजीसीए (DGCA)कडे आज फ्लाईट्सचे नवीन वेळापत्रक सादर केलं आहे. किंगफिशरने आपल्या उड्डाणांची संख्या आता अधिकृतपणे कमी केली आहे. 64 पैकी फक्त 28 विमानांचे हे वेळापत्रक आहे. यानंतर आता पुढचे काही दिवस किंगफिशरच्या उड्डाणांदरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी नीट घेतली जातेय का यावर डीजीसीए लक्ष ठेवणार आहे. दरम्यान आजही मुंबईहून 14, दिल्लीहून 4 तर बंगळुरूहुन टेकऑफ घेणार्‍या 10 फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत. पण प्रवाशांसाठी दिलाशाची गोष्ट म्हणजे कोलकात्याहुन ओरिसा आणि नैऋत्येकडील राज्यांमध्ये जाणार्‍या 4 फ्लाईट्स आज सुरू झाल्या आहेत. दरम्यान किंगफिशर एअरलाईन्सला आता स्टेट बँकेकडून लोनच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. स्टेट बँक ऑफ इंडिया किंगफिशर एअरलाईन्सला कर्ज देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय पण बँकेनं मात्र यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2012 11:13 AM IST

'किंगफिशर' डीजीसीएच्या नजरेखाली

22 फेब्रुवारी

अडचणीत सापडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या मॅनेजमेंटने डीजीसीए (DGCA)कडे आज फ्लाईट्सचे नवीन वेळापत्रक सादर केलं आहे. किंगफिशरने आपल्या उड्डाणांची संख्या आता अधिकृतपणे कमी केली आहे. 64 पैकी फक्त 28 विमानांचे हे वेळापत्रक आहे. यानंतर आता पुढचे काही दिवस किंगफिशरच्या उड्डाणांदरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी नीट घेतली जातेय का यावर डीजीसीए लक्ष ठेवणार आहे. दरम्यान आजही मुंबईहून 14, दिल्लीहून 4 तर बंगळुरूहुन टेकऑफ घेणार्‍या 10 फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत. पण प्रवाशांसाठी दिलाशाची गोष्ट म्हणजे कोलकात्याहुन ओरिसा आणि नैऋत्येकडील राज्यांमध्ये जाणार्‍या 4 फ्लाईट्स आज सुरू झाल्या आहेत. दरम्यान किंगफिशर एअरलाईन्सला आता स्टेट बँकेकडून लोनच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. स्टेट बँक ऑफ इंडिया किंगफिशर एअरलाईन्सला कर्ज देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय पण बँकेनं मात्र यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2012 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close