S M L

आशा शिंदे हत्याप्रकरणी शंकर शिंदेला न्यायालयीन कोठडी

22 फेब्रुवारीआशा शिंदे हत्याप्रकरणी आरोपी वडिल शंकर शिंदेला 6 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज जिल्हा कोर्टात शंकर शिंदेला हजर करण्यात आले होते. कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, आशा शिंदे हत्येप्रकरणी समाजाच्या सगळ्याच थरातून निषेध व्यक्त होत आहे. आशाचं शिक्षण ज्या कॉलेजमध्ये झालं. त्या राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी आशाला श्रद्धांजली वाहली. तसेच या घटनेचा तीव्र निषेध केला. इतिहासात लोकशाहीचे धडे देणारी औंध नगरी क्रूरकर्म्याच्या एका कृत्यानं बदनाम झाली. 25 वर्षाच्या अत्यंत हुशार अशा आशा शिंदेची हत्या झाली. हा नराधम दुसरा कोणी नसून तीचाच जन्मदाता बाप आहे. ही हत्या करणार्‍या क्रूरकर्मा शंकर शिंदेला सहा मार्चपर्यंत न्यायालयानं कोठडीत पाठवलं. या घटनेनंतर औंधमधल्या शिंदे कुटुंबीयांच्या घराला मात्र कुलूप आहे. तिच्या घरच्यांनी मृत्यूनंतरही तिला माफ केलेलं नाही.आंतरजातीय विवाह करण्यासाठी आशानं केलेलं बंड तिच्या जीवावर बेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. आशा ही विद्यार्थी दशेपासूनच बंडखोर होती असं तिच्या शिक्षिका सांगतात.तिच्या शिक्षिका कविता म्हेत्रे म्हणतात,ती मुळातच बंडखोर होती. स्वत:चे निर्णय ती स्वत:च घ्यायची. आता तर पालक आणि मुलगी यांच्यातील नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आशाच्या खूनाचा औंधमधल्या नागरीकांनीही एकत्रीतपणे निषेध केला. एवढंच नाही तर शंकर शिंदेला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही केली. गेली अनेक वर्षे 18 पगड जातीची लोकं गावात गुण्यागोविंदानं राहतात. आशाच्या खूनामागे गावाचा कोणताही पाठिंबा नव्हता असं गावकर्‍यांचं निक्षूण सांगितलं आहे. नाही म्हटलं तरी आजही जातीच्या बेड्यातून समाजाचे पाय बाहेर पडलेले नाहीत. म्हणूनच खोट्या इभ्रतीसाठी आशा सारख्या मुलींना आपला जीव गमवावा लागतोय. ही आपल्या सगळ्यांसाठी शरमेची बाब आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2012 11:24 AM IST

आशा शिंदे हत्याप्रकरणी शंकर शिंदेला न्यायालयीन कोठडी

22 फेब्रुवारी

आशा शिंदे हत्याप्रकरणी आरोपी वडिल शंकर शिंदेला 6 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज जिल्हा कोर्टात शंकर शिंदेला हजर करण्यात आले होते. कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, आशा शिंदे हत्येप्रकरणी समाजाच्या सगळ्याच थरातून निषेध व्यक्त होत आहे. आशाचं शिक्षण ज्या कॉलेजमध्ये झालं. त्या राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी आशाला श्रद्धांजली वाहली. तसेच या घटनेचा तीव्र निषेध केला.

इतिहासात लोकशाहीचे धडे देणारी औंध नगरी क्रूरकर्म्याच्या एका कृत्यानं बदनाम झाली. 25 वर्षाच्या अत्यंत हुशार अशा आशा शिंदेची हत्या झाली. हा नराधम दुसरा कोणी नसून तीचाच जन्मदाता बाप आहे. ही हत्या करणार्‍या क्रूरकर्मा शंकर शिंदेला सहा मार्चपर्यंत न्यायालयानं कोठडीत पाठवलं. या घटनेनंतर औंधमधल्या शिंदे कुटुंबीयांच्या घराला मात्र कुलूप आहे. तिच्या घरच्यांनी मृत्यूनंतरही तिला माफ केलेलं नाही.आंतरजातीय विवाह करण्यासाठी आशानं केलेलं बंड तिच्या जीवावर बेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. आशा ही विद्यार्थी दशेपासूनच बंडखोर होती असं तिच्या शिक्षिका सांगतात.तिच्या शिक्षिका कविता म्हेत्रे म्हणतात,ती मुळातच बंडखोर होती. स्वत:चे निर्णय ती स्वत:च घ्यायची.

आता तर पालक आणि मुलगी यांच्यातील नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आशाच्या खूनाचा औंधमधल्या नागरीकांनीही एकत्रीतपणे निषेध केला. एवढंच नाही तर शंकर शिंदेला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही केली.

गेली अनेक वर्षे 18 पगड जातीची लोकं गावात गुण्यागोविंदानं राहतात. आशाच्या खूनामागे गावाचा कोणताही पाठिंबा नव्हता असं गावकर्‍यांचं निक्षूण सांगितलं आहे. नाही म्हटलं तरी आजही जातीच्या बेड्यातून समाजाचे पाय बाहेर पडलेले नाहीत. म्हणूनच खोट्या इभ्रतीसाठी आशा सारख्या मुलींना आपला जीव गमवावा लागतोय. ही आपल्या सगळ्यांसाठी शरमेची बाब आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2012 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close