S M L

इव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी झाल्याचे उघड

21 फेब्रुवारीमतदानयंत्र (इव्हीएम मशीन)चे कुठलंही बटण दाबलं तरीही मत मात्र राष्ट्रवादीला पडत असल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपुर्वी कोल्हापूर जिल्ह्यात निदर्शनाला आली होती. ही घटना ताजी असतानाच नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या माळशीरस तालुक्यातील मतमोजणी प्रसंगी चक्क मतदान यंत्रांची हेराफेरी केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता इथल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पराभूत उमेदवार प्रियांका पालवे यांनी निवडणूक आयोगाकडे फेरमतदानाची मागणी केली आहे. निवडणूक अधिकार्‍यांनी ही बाब नजरचुकीने झाल्याची कबुली निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतमोजणी करताना मांडवे जिल्हा परिषद गटातील मतदान यंत्र पंचायत समितीच्या गणात मोजले गेले तर गणाचे यंत्र गटात मोजले गेले. त्यामुळे यात कुठलाही घोटाळा झाला नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. पण या खुलाशावर प्रियांका पालवे यांचं समाधान न झाल्याने निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला असून दोषींवर कारवाई करुन आपल्याला विजयी घोषित करावे किंवा मांडवे गावात फेरमतदान घ्यावे अशी मागणी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2012 01:31 PM IST

इव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी झाल्याचे उघड

21 फेब्रुवारी

मतदानयंत्र (इव्हीएम मशीन)चे कुठलंही बटण दाबलं तरीही मत मात्र राष्ट्रवादीला पडत असल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपुर्वी कोल्हापूर जिल्ह्यात निदर्शनाला आली होती. ही घटना ताजी असतानाच नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या माळशीरस तालुक्यातील मतमोजणी प्रसंगी चक्क मतदान यंत्रांची हेराफेरी केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता इथल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पराभूत उमेदवार प्रियांका पालवे यांनी निवडणूक आयोगाकडे फेरमतदानाची मागणी केली आहे.

निवडणूक अधिकार्‍यांनी ही बाब नजरचुकीने झाल्याची कबुली निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतमोजणी करताना मांडवे जिल्हा परिषद गटातील मतदान यंत्र पंचायत समितीच्या गणात मोजले गेले तर गणाचे यंत्र गटात मोजले गेले. त्यामुळे यात कुठलाही घोटाळा झाला नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. पण या खुलाशावर प्रियांका पालवे यांचं समाधान न झाल्याने निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला असून दोषींवर कारवाई करुन आपल्याला विजयी घोषित करावे किंवा मांडवे गावात फेरमतदान घ्यावे अशी मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2012 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close