S M L

नालासोपार्‍यात एसीई अ ॅकडमीने विद्यार्थ्यांना फसवले

22 फेब्रुवारीनालासोपारा स्टेशनजवळील एसीई (ACE) ऍकडमीने बारावीच्या 30 ते 40 विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. हॉलतिकीट न दिल्याने या विद्यार्थ्यांना परिक्षा देता आली नाही. संतप्त पालकांनी क्लासच्या संचालकांसह दोघांना नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. नालासोपारा स्टेशनजवळील आकाशा टॉवर या इमारतीत एसीई ऍकडमी गेल्या 3 वर्षांपासून आहे. ऍकडमीच्या संचालकांनी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेला बसवण्यासाठी प्रत्येकी 3500 रुपये उकळले. परिक्षेचं वेळापत्रक जाहीर झाल्याने हॉल तिकीटसाठी चकरा मारणार्‍या विद्यार्थ्यांना क्लासच्या संचालकांनी टोलवाटोलवी सुरु केली. आज परिक्षेसाठी केंद्रावर गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं. अखेर विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनीही शिक्षणमंत्र्यांशी संपर्क करायचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2012 02:30 PM IST

22 फेब्रुवारी

नालासोपारा स्टेशनजवळील एसीई (ACE) ऍकडमीने बारावीच्या 30 ते 40 विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. हॉलतिकीट न दिल्याने या विद्यार्थ्यांना परिक्षा देता आली नाही. संतप्त पालकांनी क्लासच्या संचालकांसह दोघांना नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. नालासोपारा स्टेशनजवळील आकाशा टॉवर या इमारतीत एसीई ऍकडमी गेल्या 3 वर्षांपासून आहे. ऍकडमीच्या संचालकांनी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेला बसवण्यासाठी प्रत्येकी 3500 रुपये उकळले. परिक्षेचं वेळापत्रक जाहीर झाल्याने हॉल तिकीटसाठी चकरा मारणार्‍या विद्यार्थ्यांना क्लासच्या संचालकांनी टोलवाटोलवी सुरु केली. आज परिक्षेसाठी केंद्रावर गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं. अखेर विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनीही शिक्षणमंत्र्यांशी संपर्क करायचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2012 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close