S M L

महापालिकांच्या महापौरपदाची सोडत जाहीर

22 फेब्रुवारीआज राज्यातल्या काही महापालिकांच्या महापौरपदाची सोडत मंत्रालयात काढण्यात आली. त्यात मुंबई, नागपूर, अहमदनगर, उल्हासनगर महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गाचा पुरुष महापौर असणार आहे, हे नगरविकास खात्याने जाहीर केलं आहे. पण ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या तीन महापालिकांपैकी एका महापालिकेत मागासवर्गीय महिला महापौर असेल. तसेच नाशिक, मीरा-भाईंदर, भिवंडी, धुळे आणि नांदेड-वाघाळा या पाच महापालिकांपैकी कुठल्याही दोन महापालिकांचे महापौरपद खुल्या गटातल्या महिलेसाठी आरक्षित होणार आहेत. तसेच नाशिक, मीरा-भाईंदर, भिवंडी, धुळे आणि नांदेड या महापालिकांपैकी कोणत्याही दोन महापालिकांचे महापौरपद खुल्या वर्गातील महिला उमेदवाराकडे जाऊ शकतं. 50 टक्के महिला आरक्षणाचा निर्णय लागू झाल्यानंतर मुंबईसह नुकत्याच निवडणूक झालेल्या आणखी सात महापालिकांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यामुळे या महापालिकांसाठी पुन्हा सोडत काढली जाणार नाही. असंही नगरविकास खात्याने स्पष्ट केलं आहे. मुंबई, नागपूर, अहमदनगर आणि उल्हासनगर महापौरपद खुल्या सर्वसाधारण गटासाठी राखीव केलं गेलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2012 11:58 AM IST

महापालिकांच्या महापौरपदाची सोडत जाहीर

22 फेब्रुवारी

आज राज्यातल्या काही महापालिकांच्या महापौरपदाची सोडत मंत्रालयात काढण्यात आली. त्यात मुंबई, नागपूर, अहमदनगर, उल्हासनगर महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गाचा पुरुष महापौर असणार आहे, हे नगरविकास खात्याने जाहीर केलं आहे. पण ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या तीन महापालिकांपैकी एका महापालिकेत मागासवर्गीय महिला महापौर असेल. तसेच नाशिक, मीरा-भाईंदर, भिवंडी, धुळे आणि नांदेड-वाघाळा या पाच महापालिकांपैकी कुठल्याही दोन महापालिकांचे महापौरपद खुल्या गटातल्या महिलेसाठी आरक्षित होणार आहेत. तसेच नाशिक, मीरा-भाईंदर, भिवंडी, धुळे आणि नांदेड या महापालिकांपैकी कोणत्याही दोन महापालिकांचे महापौरपद खुल्या वर्गातील महिला उमेदवाराकडे जाऊ शकतं. 50 टक्के महिला आरक्षणाचा निर्णय लागू झाल्यानंतर मुंबईसह नुकत्याच निवडणूक झालेल्या आणखी सात महापालिकांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यामुळे या महापालिकांसाठी पुन्हा सोडत काढली जाणार नाही. असंही नगरविकास खात्याने स्पष्ट केलं आहे. मुंबई, नागपूर, अहमदनगर आणि उल्हासनगर महापौरपद खुल्या सर्वसाधारण गटासाठी राखीव केलं गेलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2012 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close