S M L

गृहपाठ न केल्याने शिक्षकेनी दिली विद्यार्थ्याला मृत्यूची शिक्षा

21 फेब्रुवारीगृहपाठ न केल्याने वर्गशिक्षिकेने विद्यार्थ्याला कित्येक तास कोंडून ठेवलं आणि या मानसिक धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सहा वर्षांच्या पंकजलाशिक्षिकेनं सूर्यप्रकाशही पोचू शकणार नाही अशा बंद खोलीत कोंडून ठेवलं होतं. राजकुल गर्व्हमेंट हायस्कूलचा विद्यार्थी होता. शाळा बंद झाल्यानंतरही तो खोलीतच बंद होता. पालकांनी शोध घेतला तेव्हा पंकज मानसिक ताणाखाली, भेदरलेल्या अवस्थेत होता. हा ताण सहन न झाल्याने पंकजला एक महिना रोहतक हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरु होते. पण पंकज या मानसिक धक्कयातून सावरु शकला नाही. पालकांनी पंकजच्या मृत्यूला शाळा आणि शिक्षकांना जबाबदार धरलं आहे. या दुर्देवी घटनेनंतर पंचायतही बोलवण्यात आली. शाळेच्या प्रतिनिधींनी यावेळी गावकर्‍यांची माफी मागितली. पंकजच्या मृत्यूनंतर पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली. पण एक महिना उलटल्यानंतरही शिक्षक किंवा शाळेवर आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2012 04:49 PM IST

गृहपाठ न केल्याने शिक्षकेनी दिली विद्यार्थ्याला मृत्यूची शिक्षा

21 फेब्रुवारी

गृहपाठ न केल्याने वर्गशिक्षिकेने विद्यार्थ्याला कित्येक तास कोंडून ठेवलं आणि या मानसिक धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सहा वर्षांच्या पंकजलाशिक्षिकेनं सूर्यप्रकाशही पोचू शकणार नाही अशा बंद खोलीत कोंडून ठेवलं होतं. राजकुल गर्व्हमेंट हायस्कूलचा विद्यार्थी होता. शाळा बंद झाल्यानंतरही तो खोलीतच बंद होता. पालकांनी शोध घेतला तेव्हा पंकज मानसिक ताणाखाली, भेदरलेल्या अवस्थेत होता. हा ताण सहन न झाल्याने पंकजला एक महिना रोहतक हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरु होते. पण पंकज या मानसिक धक्कयातून सावरु शकला नाही. पालकांनी पंकजच्या मृत्यूला शाळा आणि शिक्षकांना जबाबदार धरलं आहे. या दुर्देवी घटनेनंतर पंचायतही बोलवण्यात आली. शाळेच्या प्रतिनिधींनी यावेळी गावकर्‍यांची माफी मागितली. पंकजच्या मृत्यूनंतर पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली. पण एक महिना उलटल्यानंतरही शिक्षक किंवा शाळेवर आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2012 04:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close