S M L

हॉकीमध्ये कॅनडाला हरवत भारत फायनलमध्ये

23 फेब्रुवारीऑलिम्पिक हॉकी क्वालिफाईंग स्पर्धेत भारताने सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने कॅनडाचा पराभव करत फायनलमध्येही धडक मारली आहे. सिंगापूर, इटली आणि फ्रान्सचा धुव्वा उडवल्यानंतर आज भारताने कॅनडाचा 3-2 असा पराभव केला. कॅनडाविरुध्द गोलचं खातं उघडलं ते शिवेंद्र सिंगने. आणि त्यानंतर संदीप सिंगने खेळाची सूत्रं आपल्या हातात घेतली. संदीप सिंगने सलग दोन गोल मारत भारताला शानदार विजय मिळवून दिला. कॅनडाने 2 गोल करत चांगली लढत दिली. पण भारतीय टीमच्या आक्रमक खेळासमोर त्यांचा निभाव लागला नाही. या स्पर्धेत भारतानं 4 मॅचमध्ये तब्बल 32 गोल केले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2012 12:11 PM IST

हॉकीमध्ये कॅनडाला हरवत भारत फायनलमध्ये

23 फेब्रुवारी

ऑलिम्पिक हॉकी क्वालिफाईंग स्पर्धेत भारताने सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने कॅनडाचा पराभव करत फायनलमध्येही धडक मारली आहे. सिंगापूर, इटली आणि फ्रान्सचा धुव्वा उडवल्यानंतर आज भारताने कॅनडाचा 3-2 असा पराभव केला. कॅनडाविरुध्द गोलचं खातं उघडलं ते शिवेंद्र सिंगने. आणि त्यानंतर संदीप सिंगने खेळाची सूत्रं आपल्या हातात घेतली. संदीप सिंगने सलग दोन गोल मारत भारताला शानदार विजय मिळवून दिला. कॅनडाने 2 गोल करत चांगली लढत दिली. पण भारतीय टीमच्या आक्रमक खेळासमोर त्यांचा निभाव लागला नाही. या स्पर्धेत भारतानं 4 मॅचमध्ये तब्बल 32 गोल केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2012 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close