S M L

आशा शिंदे हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

23 फेब्रुवारीसातारा जिल्ह्यात झालेल्या आशा शिंदेच्या हत्येला पाच दिवस उलटले आहे. सर्वच थरातून याचा निषेध व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्याची दखल घेतली आहे. साता-या जिल्ह्यातल्याऔंधमध्ये निरागस आशा शिंदेचा बळी जाऊन आता पाच दिवसे लोटले. पण लोकांमधला संताप अजूनही कमी झाला नाही. केवळ दुस-या जातीतल्या मुलाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, म्हणून आशाचा जीव तिच्या वडिलांनीच घेतला. याविरुद्ध पुण्यातल्या जनवादी संघटनेनं मोठ्या आंदोलनाची हाक दिली. राज्य सरकारने उशिरा का होईना, या प्रकरणाची दखल घेतली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय की या प्रकरणाचा खोलात जाऊन विचार केला पाहिजे असं म्हटलं आहे. जातीच्या खोट्या इभ्रतीसाठी झालेली आशाची हत्या हा सामाजिक प्रश्न असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. त्यांनीच साता-यात लेक लाडकी हे अभियानही चालवलं होतं. दरम्यान, या घटनेला 5 दिवस उलटल्यानंतरही औंधमधील आशाचं घर बंदच आहे. तिची आई आणि भाऊ कुठे गेलेत, याबद्दल कुणालाच माहिती नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2012 04:32 PM IST

आशा शिंदे हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

23 फेब्रुवारी

सातारा जिल्ह्यात झालेल्या आशा शिंदेच्या हत्येला पाच दिवस उलटले आहे. सर्वच थरातून याचा निषेध व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्याची दखल घेतली आहे.

साता-या जिल्ह्यातल्याऔंधमध्ये निरागस आशा शिंदेचा बळी जाऊन आता पाच दिवसे लोटले. पण लोकांमधला संताप अजूनही कमी झाला नाही. केवळ दुस-या जातीतल्या मुलाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, म्हणून आशाचा जीव तिच्या वडिलांनीच घेतला. याविरुद्ध पुण्यातल्या जनवादी संघटनेनं मोठ्या आंदोलनाची हाक दिली. राज्य सरकारने उशिरा का होईना, या प्रकरणाची दखल घेतली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय की या प्रकरणाचा खोलात जाऊन विचार केला पाहिजे असं म्हटलं आहे.

जातीच्या खोट्या इभ्रतीसाठी झालेली आशाची हत्या हा सामाजिक प्रश्न असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. त्यांनीच साता-यात लेक लाडकी हे अभियानही चालवलं होतं.

दरम्यान, या घटनेला 5 दिवस उलटल्यानंतरही औंधमधील आशाचं घर बंदच आहे. तिची आई आणि भाऊ कुठे गेलेत, याबद्दल कुणालाच माहिती नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2012 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close